थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी बंद करणार नाही - ऊर्जामंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:54 AM2018-12-08T05:54:24+5:302018-12-08T05:54:27+5:30

शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी, कोणत्याही कृषिपंपधारकांची थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी बंद करू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला दिले.

 Electricity bills will not be discontinued - Electricity minister | थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी बंद करणार नाही - ऊर्जामंत्री

थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी बंद करणार नाही - ऊर्जामंत्री

Next

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी, कोणत्याही कृषिपंपधारकांची थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी बंद करू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला दिले.
वांद्रे येथील प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्यासह उर्वरित पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रात २५ हजार सोलार पंप एका वर्षात बसविण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. एच.टी. आणि एल.टी. सहकारी पाणीपुरवठा संस्थांना ११६ पैसे प्रतियुनिट वीज दर मार्च २०२० पर्यंत ठेवावा, असा आदेशही त्यांनी महावितरणला दिला. सहकारी पाणीपुरवठा संस्थांची व खासगी कृषी पंपधारकांची वीज जोडणी थकीत वीज बिलासाठी बंद करणार नाही, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

Web Title:  Electricity bills will not be discontinued - Electricity minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.