मुंबईत वीजचोरीला संघटित स्वरूप, वीजचोर टोळ्यांची ‘दहशत’ : वीज वितरण कंपन्यांकडून दंडासह गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:59 AM2017-12-18T01:59:29+5:302017-12-18T01:59:47+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात वीजमाफिया हे आता त्यांच्या कारवाया संघटित स्वरूपात करत असून त्यांच्या विभागात दहशत पसरवीत आहेत. परिणामी वीजचोरांना थोपविण्यासाठी वीज कंपन्यांकडून ‘सर्जिकल स्ट्राइक’ सुरू असून, अशा प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यासह संबंधितांना दंडही ठोठाविण्यात येत असल्याची माहिती बेस्ट, रिलायन्स एनर्जी, महावितरणकडून देण्यात आली.

 Electricity companies get 'panic' in power plants: Electricity companies | मुंबईत वीजचोरीला संघटित स्वरूप, वीजचोर टोळ्यांची ‘दहशत’ : वीज वितरण कंपन्यांकडून दंडासह गुन्हे दाखल

मुंबईत वीजचोरीला संघटित स्वरूप, वीजचोर टोळ्यांची ‘दहशत’ : वीज वितरण कंपन्यांकडून दंडासह गुन्हे दाखल

Next

सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वीजमाफिया हे आता त्यांच्या कारवाया संघटित स्वरूपात करत असून त्यांच्या विभागात दहशत पसरवीत आहेत. परिणामी वीजचोरांना थोपविण्यासाठी वीज कंपन्यांकडून ‘सर्जिकल स्ट्राइक’ सुरू असून, अशा प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यासह संबंधितांना दंडही ठोठाविण्यात येत असल्याची माहिती बेस्ट, रिलायन्स एनर्जी, महावितरणकडून देण्यात आली.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेहरामपाडा, जुहूलेन, गिल्बर्ट हिल किंवा शिवाजीनगर आणि चित्ता कॅम्प या परिसरात वीजमाफिया बेकायदेशीर वीजवितरण जाळे चालवितात. येथील रहिवासी
वैध जोडणी घेऊ शकतात, मात्र भीतीपोटी ते या माफियांकडून
चोरीची वीज घेतात. समाजकंटक लोकांना चोरीची वीज घेण्यास भाग पाडतात. वांद्रे येथील बेहरामपाड्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होते. येथील दुमजली झोपड्या आणि चिंचोळ्या पायवाटांमुळे अवैध तार शोधणे कठीण होते. येथील समाजकंटक चोरीची वीज ग्राहकांना विकतात.
रिमोट कंट्रोलने होतेय
विजेची चोरी-
कांदिवली पश्चिमेकडील गणेशनगरमधल्या एका इंजेक्शन मोल्डिंग युनिट चालविणाºया मालकाला रिलायन्स एनर्जीच्या दक्षता पथकाने वीज चोरताना रंगेहाथ पकडले होते. अत्याधुनिक उपकरण वापरत येथे विजेची चोरी करण्यात आली होती. रिमोट कंट्रोलने मीटर निकामी करून त्यातून चोरी केली जात होती. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत अशा पद्धतीचे रिमोट कंट्रोल सर्किट मीटरच्या प्रिंटेड सर्किटच्या बोर्डवर आढळून आले होते.
कांदिवली येथील या प्रकारानंतर येथील मीटर ताब्यात घेत तो बोरीवली येथील राष्ट्रीय प्रमाणन बोर्ड, तपासणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळेत उघडण्यात आला होता. प्रयोगशाळेत चाचणी चालू असताना मीटर उघडल्यावर मीटरच्या मागच्या बाजूला चौकोनी आकार कापलेला आढळला होता.
तपासणीदरम्यान मीटरची ऊर्जा रेकॉर्डिंग प्रणाली रिमोट कंट्रोल सर्किटद्वारे रिमोट उपकरणाने नियंत्रण केली जात होती. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ३१ हजार ७४१ युनिट विजेची चोरी करण्यात आली होती. याची रक्कम ७ लाख ५० हजार ५२ रुपये होती, अशी माहिती रिलायन्सकडून देण्यात आली.
रिलायन्सची कारवाई
रिलायन्सने वर्षभरात वीजचोरी प्रकरणात ४ हजार १०० ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले. वीजचोरी प्रकरणात एकूण १२० एफआयआर दाखल करण्यात आले. गतवर्षी वीजचोरीची एकूण २ हजार ४८६ प्रकरणे होती. चेंबूर, मानखुर्द, बेहरामपाडा आणि जुहूलेन येथे वीजचोरीच्या घटना अधिक होतात. शिवाय शिवाजीनगर, चित्ता कॅम्प, समसुद्दीन नगर, शिवनेरी (मानखुर्द), चिकूवाडी (जय हिंदनगर), कुरेशीनगर, गिल्बर्ट हिल येथेही वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
महावितरणची कारवाई-
विजेची चोरी आकडा टाकून, एखाद्याच्या मीटरमधून अनधिकृतरीत्या वीज घेऊ न किंवा मीटरशी छेडछाड करून वीज घेणे या तीन प्रकारांतून केली जाते. भांडुप आणि मुलुंडमध्ये आकडा टाकत वीजचोरी करण्याचे प्रमाण शून्य आहे. कारण वीज वाहिन्या भूमिगत आहेत. अनधिकृतरीत्या वीजचोरी केल्याप्रकरणी भांडुपमधून ५ लोकांकडून ५ लाख ४७ हजार वसूल करण्यात आले. मुलुंडमध्ये हे प्रमाण शून्य आहे. मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी भांडुपमध्ये १२ ग्राहकांकडून १९ लाख ३६ हजार रुपये वसूल करण्यात आले. मुलुंडमध्ये १३ ग्राहकांकडून ३ लाख ७० हजार वसूल करण्यात आले आहेत. भांडुपमध्ये एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भांडुप येथील सहा प्रकरणांत ३९ हजार वसूल करण्यात आले. मुलुंडमध्ये १० प्रकरणांत ५० हजार वसूल करण्यात आले.

Web Title:  Electricity companies get 'panic' in power plants: Electricity companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई