Join us

वीज ग्राहकांकडे बिलांचे ६८६.२५ कोटी थकीत, रस्त्यांवरील दिव्यांची थकबाकी मोठी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:24 AM

Electricity News: भांडूप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी ६८६.२५ कोटी रुपये आहे. यात स्ट्रीट लाईटचीही थकबाकी खूप मोठी आहे.

मुंबई : ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. वीज खरेदीबरोबरच वीज वहनसाठीसुद्धा खर्च करावा लागतो. त्याशिवाय देखभाल व दुरुस्तीची कामे व इतर खर्च टाळणे शक्य नाही. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत भांडूप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी ६८६.२५ कोटी रुपये आहे. यात स्ट्रीट लाईटचीही थकबाकी खूप मोठी आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, भांडूप परिमंडळात उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ५६.८२ कोटी रुपये असून लघुदाब ग्राहकांसह स्ट्रीट लाईटचीही थकबाकी खूप मोठी आहे. परिणामी स्ट्रीट लाईटचे व पाणी पुरवठ्याचे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक वेळा सकाळच्या वेळेतसुद्धा स्ट्रीट लाईट सुरूच असते. त्यामुळे ऑटोमॅटिक स्विच बसविण्याची व्यवस्था करावी जेणेकरून दिवसा लाईट ऑटोमॅटिक बंद होईल व वीज बिलातसुद्धा फायदा होईल. जर ग्राहकांनी नियमितपणे आपले वीज देयक भरले तर भविष्यातसुद्धा अशी चांगली व संक्षम सेवा देणे  शक्य होईल. भांडूप परिमंडळातील ग्राहकांना नियोजन करून उत्तम  सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या थकीत वीज बिलांचा भरणा करावा व महामारीच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

कोणाकडे किती बाकी?घरगुती    २००.७८ कोटीव्यावसायिक    १२०.८२ कोटीऔद्योगिक     ८८.३१ कोटीपाणीपुरवठा योजनांचे    ७.१७ कोटीस्ट्रीट लाईट    १९५.६१ कोटीइतर ग्राहकांचे     १२.१९ कोटीकृषी पंप ग्राहकांचे    ४.६६ कोटी

टॅग्स :वीजमुंबई