Join us

भाडुंप,कळवा,ठाणे, ऐरोलीत खंडीत करण्यात आलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 5:43 PM

भांडुप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे व वाशी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक भागात खंडित करण्यात आलेला  विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत पुन्हा सुरू करण्यात आला.

मुंबई, दि. 30 - भांडुप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे व वाशी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक भागात खंडित करण्यात आलेला  विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत पुन्हा सुरू करण्यात आला. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर पाण्यापावसातही मंगळवारी रात्रभर वीजपुरवठा सुरु करण्यासाठी परिश्रम घेतले.

ठाणे, कळवा, कोपरी, पावर हाऊस, वागळे इस्टेट, मुंब्रा, ऐरोली, मुलुंड आदी परिसरात भूमिगत असलेल्या वीजवाहिन्या व फिडर पिलर पाण्याखाली आल्याने अनेक उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पावसाची तिव्रता कमी  झाल्यावर पाण्याची पातळी ओसरताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टप्पाटप्प्याने वीजपुरवठा सुरूळीत केला.   भांडुप परिमंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रभर वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामात कार्यरत होते.