Join us

महावितरणकडून वीजमीटरच्या आकड्यांचा खेळ, ७ सप्टेंबरला दाखल झाले ५० हजार मीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 12:33 AM

गणेशोत्सव मंडळांसाठी महावितरणने विजेच्या मीटरची स्वतंत्र व्यवस्था केली. दुसरीकडे बहुतांश ठिकाणी विजेच्या मीटरचा तुटवडा असून, वारंवार मागणी करूनही वीजग्राहकांना मीटर वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : गणेशोत्सव मंडळांसाठी महावितरणने विजेच्या मीटरची स्वतंत्र व्यवस्था केली. दुसरीकडे बहुतांश ठिकाणी विजेच्या मीटरचा तुटवडा असून, वारंवार मागणी करूनही वीजग्राहकांना मीटर वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. महावितरणने मात्र हे आरोप फेटाळत ७ सप्टेंबरला ५० हजार मीटर दाखल झाल्याचे सांगत बाजू सावरली आहे. त्यामुळे महावितरण वीजमीटरच्या आकड्यांचा खेळ करत असल्याची चर्चा ग्राहकांत आहे.महावितरणने मध्यंतरी सौभाग्य योजना आणि दीनदयाळ योजनेंतर्गत राज्यात नवीन वीजजोडण्या दिल्या. परिणामी, या योजनेकडे मीटर वळले गेले. त्यामुळे काही ठिकाणी, काही प्रमाणात मीटरचा तुटवडा निर्माण झाला. त्यातच त्यांनी इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर आणि नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम राज्यभर हाती घेतली. परिणामी, राज्यात थोड्या-फार प्रमाणावर मीटरचा तुटवडा होता. यावर उपाययोजना करत महावितरणने तीस लाख मीटर्सची आॅर्डर दिली.आॅर्डरनुसार, महावितरणकडे मे, २०१९ पर्यंत ३० लाख मीटर दाखल होतील, तर प्रत्येक महिन्याला ३ लाख ८० हजार मीटर येतील. निविदांद्वारे ३० लाख मीटरची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी ८९ हजार मीटर आॅगस्टमध्ये महावितरणकडे दाखल झाले आहेत. सप्टेंबरमध्ये २ लाख ६० हजार मीटर येतील. ७ सप्टेंबरला त्यापैकी ५० हजार मीटर दाखल झाल्याचे महातिवरणने स्पष्ट केले.दरम्यान, अनेक ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत असले, तरी महावितरणने गणेश मंडळांना वीजजोडण्या घेण्याचे आव्हान केल्यामुळे, त्यांना तातडीने मीटर देण्याचे आदेशही महावितरणने संबंधित विभागांना दिले आहेत.... म्हणूनच तातडीने जोडणी देण्याचे आदेशअनेक ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत असले, तरी महावितरणने गणेश मंडळांना वीजजोडण्या घेण्याचे आव्हान केल्यामुळे, त्यांना तातडीने मीटर देण्याचे आदेशही महावितरणने संबंधित विभागांना दिले आहेत.

टॅग्स :महावितरण