Electricity: वीजबिलाचा झटका; १०० युनिटपर्यंत वापराल तरच परवडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:24 PM2023-04-19T14:24:53+5:302023-04-19T14:25:05+5:30

Electricity Bill: महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा या चारही वीज कंपन्यांनी दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेला हिरवा कंदील दिला असून, आता एप्रिल महिन्याची वाढीव वीजबिले मे महिन्यात वीज ग्राहकांच्या हाती पडणार आहेत.

Electricity: Electricity bill shock; Affordable only if used up to 100 units | Electricity: वीजबिलाचा झटका; १०० युनिटपर्यंत वापराल तरच परवडेल

Electricity: वीजबिलाचा झटका; १०० युनिटपर्यंत वापराल तरच परवडेल

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा या चारही वीज कंपन्यांनी दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेला हिरवा कंदील दिला असून, आता एप्रिल महिन्याची वाढीव वीजबिले मे महिन्यात वीज ग्राहकांच्या हाती पडणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या चारही वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना जोरदार शॉक दिला असून, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाच दिलासा मिळणार आहे. परिणामी वाढीव वीज बिले हातात पडू नयेत म्हणून वीज ग्राहकांनाही विजेची बचत करत बिले वाढीव येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

तेवढा दर जास्त
घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार वीजदर असतो. म्हणजे महावितरण ग्राहकांमध्ये शंभर युनिटपर्यंत वीज वापरणारे, शंभर ते तीनशे युनिट वापरणारे, तीनशे ते पाचशे युनिट वापरणारे, पाचशे ते हजार युनिट वापरणारे असे वेगवेगळे वर्ग करते. जेवढा विजेच्या वापराचा वर्ग मोठा तेवढा दर जास्त असतो.

महावितरण : २०२३-२४ साठी २.९ टक्के आणि २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ आहे.
बेस्ट : बेस्टच्या वीजदरात सरासरी वार्षिक वाढ २०२४ वर्षासाठी ५.७ टक्के आणि २०२५ साठी ६.३५ टक्के एवढी आहे.
अदानी : अदानीच्या वीजदरात २०२४ साठी २.२ टक्के आणि २०२५ साठी २.१ टक्के एवढी वाढ होणार आहे.
टाटा : टाटा पॉवरच्या वीजदराचा विचार करता वीजदरातील सरासरी वार्षिक वाढ २०२४ साठी ११.८८ टक्के आणि २०२५ साठी १२.१९ टक्के एवढी आहे.

 वीजदर वाढीची कारणे  
कोळशाच्या वाढलेल्या किमती, इंधन खर्चामध्ये झालेली वाढ, वीज खरेदी खर्चामध्ये झालेली वाढ, कोरोनादरम्यान महसुलात झालेली तूट आणि पारेषण यंत्रणा व पारेषण खर्चामध्ये झालेली वाढ; अशी अनेक कारणे या वीजदर वाढीमागे नोंदविण्यात आली आहेत.

Web Title: Electricity: Electricity bill shock; Affordable only if used up to 100 units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.