Join us

वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:46 AM

दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या नोटाबंदीने वीज क्षेत्रालाही जोरदार झटके दिले होते. आता कुठे वीज क्षेत्र पूर्वपदावर आले असले तरी याकाळात रोख रकमेचा तुटवडा असल्याने विजेचा वापर कमी झाला.

मुंबई  - दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या नोटाबंदीने वीज क्षेत्रालाही जोरदार झटके दिले होते. आता कुठे वीज क्षेत्र पूर्वपदावर आले असले तरी याकाळात रोख रकमेचा तुटवडा असल्याने विजेचा वापर कमी झाला. त्यामुळे उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाल्याने ते पुरेशा प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाले नाही. पर्यायाने आर्थिक चक्र कोलमडले. नोटबंदीनंतर तब्बल पाच ते सहा महिने हे दुष्टचक्र कायम होते, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले. आज नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच आता मात्र वीज क्षेत्र स्थिरावले, सावरल्याचेही पेंडसे यांनी नमुद केले.नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीज क्षेत्राला नोटाबंदीचा कसा फटका बसला? त्याचे परिणाम काय झाले? याबाबत अशोक पेंडसे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, नोटाबंदी झाली तेव्हा दोन ते तीन मुख्य बदल किंवा फरक नोंदविण्यात आले. एक म्हणजे मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रातील जे कामगार होते; ते सर्वसाधारणपणे रोखीवर काम करत होते. टेक्सटाईल, पावरलूम, सर्व्हिस इंडस्ट्री या क्षेत्रातील कामगारांना याचा मोठा फटका बसला. कारण त्यांच्याकडे पैसेच नव्हते. त्यांना जो पगार असतो तो आठ दिवसांनी किंवा पाच दिवसांनी रोख मिळतो. परिणामी त्यांना फटका बसला.पावरलूम, बांधकाम क्षेत्रातील जे मजूर आहेत; किंवा कंत्राटावर काम करणारे मजूर आहेत, अशा लघु आणि मध्यम उद्योगातील मजुरांना पैसे रोखीने देत कामे केली जातात. नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने त्यांचा जो विजेचा वापर होता त्यातही फरक नोंदविण्यात आला. कारण त्यांनी वीज वापरलीच नाही. वीज वापरण्यासाठी त्यांच्याकडे काम नव्हते. रोख रकमेचा तुटवडा जाणवल्याने दोन्ही बाजूचे व्यवहार बंद होते. याचा फटका अर्थकारणास बसला. परिणामी आर्थिक विकास झाला नाही. उत्पादने झाली नाहीत. उत्पादन झाली नाहीत म्हणजे वीज वापरली गेली नाही. वीज वापरली गेली नसतानाच क्रॉस सबसिडी कमी मिळाली. हे सगळे अर्थचक्र बिघडवणारे वर्तुळ आहे.सध्या परिस्थिती सर्वसाधारणरोख रक्कम नसल्याने वीज वापरली गेली नाही. वीज वापरण्यात आली नसल्याने उत्पादने झाली नाहीत. उत्पादन झाले नसल्याने ते बाजारात आले नाही. परिणामी बाजाराला आर्थिक फटका बसला. नोटबंदीने बसलेला फटका हा केवळ महिनाभरापुरता मर्यादित नव्हता. तर पुढचे पाच ते सहा महिने हा फटका बसला. पाच महिने यासंदर्भातील आर्थिक चक्र ठप्प होते. सद्यस्थितीचा विचार करता आजघडीला परिस्थिती सर्वसाधारण आहे. कारण आज रोख रक्कम हाती खेळते आहे.मजुरांना पैसे रोखीने देणे अवघडपावरलूम, बांधकाम क्षेत्रातील काम करणाºया मजुरांना किंवा कंत्राटावर काम करणाºया मजुरांना रोखीने पैसे देऊन काम करून घेतले जाते. परंतु नोटाबंदीमुळे रोकड हातात शिल्लक राहिलीच नाही. रोकड नसल्याने या मजुरांना काम देता आले नाही. कामासाठी त्यांच्याकडून होणारा विजेचा वापर कमी झाला. कारण वीज वापरण्यासाठी हाताला कामच नव्हते. रोख रक्कम नसल्याने दोन्ही बाजूंचे अर्थकारण बिघडले, असे वीजतज्ज्ञ पेंडसे म्हणाले.

टॅग्स :वीजमुंबई