गेल्या वर्षीच्या तुलनेत वीजचोरीत वाढ

By Admin | Published: May 11, 2017 02:24 AM2017-05-11T02:24:45+5:302017-05-11T02:24:45+5:30

मुंबईच्या उपनगरात होत असलेल्या वीजचोरीला आळा बसावा, म्हणून रिलायन्स एनर्जीने मोहीम हाती घेतली असून, वीजवितरण जाळ्यातून

Electricity increase compared to last year | गेल्या वर्षीच्या तुलनेत वीजचोरीत वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत वीजचोरीत वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या उपनगरात होत असलेल्या वीजचोरीला आळा बसावा, म्हणून रिलायन्स एनर्जीने मोहीम हाती घेतली असून, वीजवितरण जाळ्यातून अनधिकृत वायर्स टाकून वीज घेणे, तसेच इतर काही ठिकाणांहून बेकादेशीररीत्या वीजजोडणी घेणाऱ्यांवर रोख बसावा, म्हणून पोलिसांच्या मदतीने या वर्षात ४ हजार १०० छापे घालण्यात आले आहेत.
वीजचोरी विरोधात १२० एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०१५-१६ मध्ये ५६ एफआयआरची नोंद झाली होती, तर या वर्षी २०५ बेकायदेशीर वीज वितरक आणि ३७४ ग्राहकांवर एफआयआर नोंदी झाल्या आहेत. एकूण या वर्षी ४ हजार १०० छाप्यांमध्ये ४ हजार ४० प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, वीजचोरी रोखण्यासाठी, वीजचोरी विषयीची मोहीम वर्षभर सुरू ठेवण्यात येईल, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले.

Web Title: Electricity increase compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.