लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या उपनगरात होत असलेल्या वीजचोरीला आळा बसावा, म्हणून रिलायन्स एनर्जीने मोहीम हाती घेतली असून, वीजवितरण जाळ्यातून अनधिकृत वायर्स टाकून वीज घेणे, तसेच इतर काही ठिकाणांहून बेकादेशीररीत्या वीजजोडणी घेणाऱ्यांवर रोख बसावा, म्हणून पोलिसांच्या मदतीने या वर्षात ४ हजार १०० छापे घालण्यात आले आहेत.वीजचोरी विरोधात १२० एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०१५-१६ मध्ये ५६ एफआयआरची नोंद झाली होती, तर या वर्षी २०५ बेकायदेशीर वीज वितरक आणि ३७४ ग्राहकांवर एफआयआर नोंदी झाल्या आहेत. एकूण या वर्षी ४ हजार १०० छाप्यांमध्ये ४ हजार ४० प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, वीजचोरी रोखण्यासाठी, वीजचोरी विषयीची मोहीम वर्षभर सुरू ठेवण्यात येईल, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वीजचोरीत वाढ
By admin | Published: May 11, 2017 2:24 AM