वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 04:46 PM2018-03-28T16:46:49+5:302018-03-28T16:46:49+5:30

चालू तसेच थकीत वीजबिलाचा भरणा ग्राहकांना करता यावा याकरता म्हणून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २९ व ३० मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील सुमारे १९५ हून अधिक वीज बिल भरणा केंद्रांचा यामध्ये समावेश राहणार आहे.

Electricity payment centers continue on holidays | वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू

वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू

googlenewsNext

मुंबई - चालू तसेच थकीत वीजबिलाचा भरणा ग्राहकांना करता यावा याकरता म्हणून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २९ व ३० मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील सुमारे १९५ हून अधिक वीज बिल भरणा केंद्रांचा यामध्ये समावेश राहणार आहे.
महावितरणमार्फत वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी  ‘शून्य थकबाकी मोहीम’ सुरु आहे. वीज बिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाही केली जात आहे. त्यामुळे थकीत देयाकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे याकरता गुरुवार व शुक्रवार या दिवशी सार्वजनिक सुट्टया असल्या तरी महावितरणच्या ठाणे सर्कत अंतर्गत येत असलेल्या गडकरी, किसान नगर, कोपरी, पॉवर हाऊस, विकास, कळवा, शिळ, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोलशेत, लोकमान्य नगर, मुलुंड, नीलम नगर, पाच रस्ता, सर्वोदय, भांडुप, पन्नालाल, ईश्वर नगर या उप-विभागातील तसेच वाशी सर्कल अंतर्गत येत असलेल्या वाशी, एरोली, कोपर खैरणे, नेरूळ पामबीच, सी.बी.डी. बेलापूर, पनवेल, भिंगरी, कळंबोली, उरण खारगर या उपविभागातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
 
आॅनलाईन सेवा
चालू व थकीत वीजबिल भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अपच्या माध्यमातून ग्राहक आॅनलाईन पद्धतीने वीज बिल भरू शकतात. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यातील थकबाकीचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Electricity payment centers continue on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई