वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

By admin | Published: November 26, 2014 10:43 PM2014-11-26T22:43:34+5:302014-11-26T22:43:34+5:30

पनवेल शहर हे नावाला भारनियमनमुक्त असले तरी सतत वीजपुरवठा खंडित होणो हे नित्याचेच झाले आहे.

Electricity repairs | वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

वीजग्राहकांना दुरुस्तीचा भरुदड

Next
पनवेल : पनवेल शहर हे नावाला भारनियमनमुक्त असले तरी सतत वीजपुरवठा खंडित होणो हे नित्याचेच झाले आहे. मंगळवारी तर मेंटेनन्सच्या नावाखाली कधीही वीजपुरवठा बंद केला जातो. शिवाय जाहीर केलेल्या वेळेत वीजपुरवठा सुरळीतही होत नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्रस सहन करावा लागत आहे.
पनवेल शहरातील बहुतांश वीजवितरण व्यवस्था अतिशय जुनाट झाली असून ते बदलण्याकरिता वीजवितरण कंपनीला मुहूर्त सापडत नाही. ओव्हरहेड वायरींमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर अनेक पोल जुनाट आणि गंजलेले आहेत. त्याचबरोबर रोहित्रची स्थिती फारशी चांगली नाहीच. त्याचबरोबर वीजवाहिन्यांची क्षमताही कमी पडू लागली आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. 
वीज वाहिन्यांमध्ये बिघाड, कधी वायर जळाली, कधी फिडरमध्ये प्रॉब्लेम अशी कारणो वीज वितरणकडून ग्राहकांना देण्यात येतात. मंगळवार हा महावितरणचा मेंटेनन्सचा वार असला तरी अनेकदा याबाबत सूचना दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात वीजपुरवठा कधीही खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहकांची कामे खोळंबतात. शहरातील काही भागात तर चार तासांचा शटडाऊन हा पाच ते सहा तासांवर जातो. मंगळवारी पनवेल बाजार परिसरात 3 ते 5 असा शटडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र 11 ते दीड या कालावधीत त्या परिसरातील वीज बंद ठेवण्यात आलीच. त्याचबरोबर दुपारी 2.45 ते पाच या वेळेतही शटडाऊन घेण्यात आला. 
या विभागात मोठमोठी दुकाने, उपाहारगृहे, व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे अघोषित भारनियमनाचा सर्वानाच फटका बसतो. याबाबत व्यावसायिक नीलेश पाटील सांगतात, आम्ही वेळेवर वीज बिल भरतो, बिल भरले नाही तर वितरणकडून पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे नियमित वीजपुरवठा मिळणो हा आमचा अधिकार आहे. शिवाय वीज वाहिन्यांची दुरुस्तीची कामेही नियमित झाल्यास ग्राहकांना त्रस होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 
(वार्ताहर)
 
आठवडय़ातून एकदा वीजवितरण यंत्रणोची दुरुस्ती करणो क्रमप्राप्त आहे. त्याकरिता आम्ही मंगळवारी शटडाऊन घेतो. तोही आलटून पालटून म्हणजे एकाच वेळी सर्व ठिकाणी वीज बंद ठेवण्यात येत नाही. प्रत्येक मंगळवारी वेगवेगळय़ा ठिकाणी शटडाऊन घेतला जातो. कधी कधी थोडा विलंब लागतो मात्र नियोजित वेळेत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रय} असतो.
-एस. चंद्रमोळी, 
उपकार्यकारी अभियंता, पनवेल उपविभाग
 
4 मंगळवार हा महावितरणचा मेंटेनन्सचा वार असला तरी अनेकदा याबाबत सूचना दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात वीज पुरवठा कधीही खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहकांची कामे खोळंबतात. शहरातील काही भागात तर चार तासांचा शटडाऊन हा पाच ते सहा तासांवर जातो. 
4गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता, अनेकदा फोन उचलला जात नाही. फोन उचलला गेलाच तर फिडरमध्ये बिघाड, वायर तुटल्याची उत्तरे वारंवार दिली जातात. 

 

Web Title: Electricity repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.