इंधनापाठोपाठ आता वीज दरवाढीचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 05:16 AM2018-09-13T05:16:55+5:302018-09-13T05:17:13+5:30

राज्यातील कृषी व घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या ग्राहकांना बुधवारी राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) वीज दरवाढीचा शॉक दिला.

Electricity shock now after fuels | इंधनापाठोपाठ आता वीज दरवाढीचा शॉक

इंधनापाठोपाठ आता वीज दरवाढीचा शॉक

Next

मुंबई : राज्यातील कृषी व घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या ग्राहकांना बुधवारी राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) वीज दरवाढीचा शॉक दिला. ही वाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. इंधन दरवाढीने जनता होरपळत असताना आता वाढीव विजबिलाचा भूर्दंडही सोसावा लागणार आहे.
वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महावितरणने तोटा भरून काढण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची वीज दरवाढीचा प्रस्ताव एमईआरसीकडे दिला होता. आजच्या दरवाढीमुळे महावितरणला दोन वर्षांत २० हजार कोटी रुपये मिळतील. औद्योगिक व इतर विजेपासून न मिळू शकलेले अपेक्षित उत्पन्न आणि देखभाल व अन्य वाढलेला खर्च यामुळे महावितरणने ३२ हजार कोटी रुपयांची भरपाई वीज दरवाढीतून मागितली होती. ती न मिळाल्याने एमईआरसीकडे फेरविचार याचिका किंवा केंद्रीय वीज नियामक आयोगाकडे महावितरणला जाता येईल.
२०१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या घरगुती विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रीसिटी व टाटा पॉवरच्या वीज दरात ० ते १ टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस आयोगाचे सदस्य आय. एम. बोहरी, मुकेश खुल्लर, सदस्य सचिव अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ६ रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) ७० रुपये प्रति केव्हीए/ महिना असा असेल.
>महावितरणचे प्रति युनिट वीजदर असे
घरगुती ग्राहक आधी नवीन
० ते १०० युनिट ५.0७ रु. ५.३१ रु.
१०१ ते ३०० युनिट ८.७४ रु. ८.९५ रु.
कृषी पंप ३.३५ रु. ३.५५ रु.
कृषी पंपांचे वीज दर ५.९८ टक्के, तर घरगुती वीज वापराचे दर २.४० ते ४.५१ टक्के इतके वाढविण्यात आले आहेत.

Web Title: Electricity shock now after fuels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज