राज्यात १ एप्रिलपासून वीज होणार स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:13+5:302021-03-05T04:07:13+5:30
वीज नियामक आयोगाचे निर्देश १ एप्रिलपासून वीजदर २ टक्क्यांनी कमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा ...
वीज नियामक आयोगाचे निर्देश १ एप्रिलपासून वीजदर २ टक्क्यांनी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.
मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार महावितरण - रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्के तर बिगर रहिवाशीसाठी कंपनी, उद्योगांना २-५ टक्के.
बेस्ट - रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.१ टक्के तर बिगर रहिवाशी, कंपनी, उद्योग यांना ०.३-२.२ टक्के
अदानी - रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून 0.३ टक्के तर बिगर रहिवाशी, कंपनी, उद्योग यांना १.४-१.६ टक्के
टाटा - रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ४.३ टक्के तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योगाना १.१.-५.८टक्के दर आकारणी करणार आहे.
प्रत्यक्षात विजेचे दर वाढले; कोणतीही नवी ऑर्डर नाही
विजेचे दर २ टक्के कमी झाले आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ७ टक्क्यांनी विजेचे दर कमी झाले; असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र विजेचे दर ७ टक्के वाढले होते. गेल्यावर्षी पंचवार्षिक ऑर्डर झाली आहे. आता कोणतीही नवी ऑर्डर झालेली नाही. बहुवार्षिक ऑर्डरमध्ये २० आणि २१ यांची तुलना करावी लागेल. तुलना केल्यानंतर वाढ झाली की घट झाली, हे समजेल. आता सुद्धा एका विभागात कुठे तरी कमी झाले असतील. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले आहेत का? ते तपासावे लागेल. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले असतील; असे म्हणता येत नाही.
- प्रताप होगाडे, वीज तज्ज्ञ