दररोज दोन हजार किलो कचऱ्याचा वापर करून वीजनिर्मिती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:10 AM2021-09-04T04:10:12+5:302021-09-04T04:10:12+5:30
मुंबई : महालक्ष्मी येथील वत्सलाबाई देसाई चौकानजीक असणाऱ्या केशवराव खाड्ये मार्गालगत महापालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे ...
मुंबई : महालक्ष्मी येथील वत्सलाबाई देसाई चौकानजीक असणाऱ्या केशवराव खाड्ये मार्गालगत महापालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज दोन हजार किलो कचऱ्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. येथे दररोज सुमारे २५० ते ३०० युनिट इतकी वीजनिर्मिती होणार आहे.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या या प्रकल्पांतर्गत दररोज दोन हजार किलो कचऱ्यापासून प्रथम गॅसनिर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करून जनित्राच्या आधारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३०० इतके युनिट वीजनिर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या विजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चातदेखील बचत करणे शक्य होणार आहे.