मुंबईत विजेचा लपंडाव थांबणार! पॉवर आउटेजपूर्वीच नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:33 AM2024-02-18T11:33:58+5:302024-02-18T11:34:12+5:30

मुंबईकरांना सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते. वीज पुरवठा खंडित झाल्याने आर्थिक उद्योगांनाही मोठा फटका बसतो.

Electricity will stop in Mumbai! Information received by Network Operations Center prior to power outage | मुंबईत विजेचा लपंडाव थांबणार! पॉवर आउटेजपूर्वीच नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळणार माहिती

मुंबईत विजेचा लपंडाव थांबणार! पॉवर आउटेजपूर्वीच नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळणार माहिती

मुंबई : मुंबईकरांना सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते. वीज पुरवठा खंडित झाल्याने आर्थिक उद्योगांनाही मोठा फटका बसतो. शिवाय काही कारणांसाठी मुंबईच्या कामकाजावरही परिणाम होतो. आता असे मोठे पॉवर आऊटेज होण्यापूर्वीच त्याची माहिती नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना कमी होण्यास मदत मिळणार आहे.

पहिल्या प्रगत वितरण व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईसाठी वीज विश्वासार्हतेच्या नवीन युगात प्रवेश केला असून, नेटवर्क ऑपरेशन सेंटर हे मुंबईच्या वीज वितरणात क्रांती घडवून आणणारे नवीन तंत्रज्ञान आहे. हे सेन्सर्सच्या नेटवर्कमधून माहिती संकलित करते. ज्याचे नंतर शहराच्या वीज पायाभूत सुविधांचे संपूर्ण चित्र देण्यासाठी रिअल-टाइममध्ये विश्लेषण केले जाते. यामुळे वीज वितरणासाठी अधिक सक्रिय दृष्टिकोन निर्माण होतो.

नेमके फायदे कोणते?

 नेटवर्क ऑपरेशन सेंटर अनपेक्षित व्यत्ययांमुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत होते. यामुळे प्रभावित क्षेत्र ओळखता येतात आणि समस्या सोडविण्यासाठी सेंटर मार्गदर्शन करू शकते.

 ही प्रणाली संपूर्ण वीज नेटवर्कवर वीज प्रवाह संतुलित करण्यास मदत करते. संभाव्य वीज बिल कमी होऊ शकते.

 सौर आणि पवनसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांना एकत्रित करता येते.

देखभालीसाठी इको सीस्टिम

एडीएमएस प्लॅटफॉर्म केवळ आजसाठी उपयुक्त नाही, तर ते भविष्यासाठी तयार आहे. हे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांच्या हितासाठी विश्लेषण-आधारित देखरेख आणि देखभाल पद्धतींसाठी एक इकोसिस्टिम तयार करेल.

प्रगत परिस्थितीजन्य जागरुकता आणि नेटवर्कमधील घटनांना त्वरित प्रतिसाद याद्वारे ३१.५ लाख मुंबईकरांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी ही प्रणाली अदानी इलेक्ट्रिसिटी  सक्षम करेल.

धोक्यांपासून सुरक्षित

सायबर सिक्युरिटी : ही प्रणाली सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवते. अदानीकडून ३१.५० लाखांहून अधिक घरांना आणि आस्थापनांना वीज पुरवठा केला जातो. मुंबई आणि उपनगरात २ हजार मेगावॅटच्या जवळपास वीज दिली जाते.

नवीन हब फायदेशीर

 भारतातील पहिल्या संपूर्ण कार्यक्षम प्रगत वितरण व्यवस्थापन प्रणालीद्वारे (एडीएमएस) समर्थित नवीनतम पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा अधिग्रहण (स्कॅडा) प्रणालीसह सुसज्ज आहे.

 हे नवीन हब वीज व्यवस्थापनासाठी भविष्यातील समाधान प्रदान करून, मुंबईला याद्वारे विजेचा कसा अनुभव येतो, याची पुनर्व्याख्या करण्यात एक महत्त्वपूर्ण झेप ठरणार आहे.

Web Title: Electricity will stop in Mumbai! Information received by Network Operations Center prior to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.