वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा, खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 07:34 AM2023-01-02T07:34:12+5:302023-01-02T07:39:12+5:30

या पार्श्वभूमीवर २ जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर जिल्ह्यातील वीज कामगार मोर्चा काढणार आहेत. 

Electricity workers march today, protest against privatization policy | वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा, खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध

वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा, खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध

Next

मुंबई : भांडुप, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, तळोजा व उरण परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी वीज कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवानासाठी अर्ज केला आहे. याला वीज ग्राहक, लोकप्रतिनिधी व वीज कामगार संघटना सर्वत्र विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर २ जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर जिल्ह्यातील वीज कामगार मोर्चा काढणार आहेत. 
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून राज्यभर द्वार सभा घेऊन खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध केला आहे. २३ डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला असतानाच ४ जानेवारीपासून ७२ तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती वीज कामगार नेते कृष्णा भोयर यांनी दिली.

Web Title: Electricity workers march today, protest against privatization policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई