महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:55 PM2020-04-05T12:55:17+5:302020-04-05T12:56:02+5:30

महावितरणतर्फे २०० मीटरची लघुदाब वाहिनी टाकून नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

Electrification of the detachment cell by Mulund Division of Mahavitaran | महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

Next

मुंबई : मुलुंड विभागाअंतर्गत मिठानगर मार्ग उच्च प्राथमिक मनपा शाळा मुलुंड पूर्व येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत विलगीकरण कक्षासाठी महावितरणतर्फे २०० मीटरची लघुदाब वाहिनी टाकून नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी, अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच, वेळोवेळी येत असलेल्या या विलगीकरण कक्षासाठी  वीज जोडणीचा गरजांकडेही महावितरण तातडीने  लक्ष देत विजेची  पूर्तता करत आहे. महावितरणच्या मुलुंड विभागाने नुकतेच विलगीकरण कक्षासाठी दोन  दिवसात ४००  वीज मीटर लावले होते. पुन्हा,  या  विभागातर्फे  मुलुंड पूर्व मनपा उच्च प्राथमिक  शाळासाठी नव्याने वीज जोडणी देण्यात आली आहे.

सदर वीज जोडणी भांडूपच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या नेतृत्वात व ठाणे नागरी मंडळचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे  नागरी मंडळचे कार्यकारी अभियंता सुनील माने, मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल मस्के , संबंधित उपविभागीय अभियंता कुंदन सरोदे,  अतिरिक्त कार्यकारी अभियंता  व शाखाधिकारी संतोष गाेदे यांनी  केले आहे.

Web Title: Electrification of the detachment cell by Mulund Division of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.