विजेचा धक्का लागून मृत्यू, एकाला अटक; पाण्याची टाकी साफ करताना घडला प्रकार 

By गौरी टेंबकर | Published: May 25, 2024 11:18 AM2024-05-25T11:18:22+5:302024-05-25T11:18:46+5:30

वॉशिंग सेंटरमधील पाण्याची टाकी साफ करण्याचे काम दिले होते.

Electrocution death, one arrested; The incident happened while cleaning the water tank  | विजेचा धक्का लागून मृत्यू, एकाला अटक; पाण्याची टाकी साफ करताना घडला प्रकार 

विजेचा धक्का लागून मृत्यू, एकाला अटक; पाण्याची टाकी साफ करताना घडला प्रकार 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: जोगेश्वरी भागात दुचाकी आणि कार वॉशिंग सेंटरची टाकी साफ करताना शॉक लागून शंकर कुऱ्हाडे (३०) नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. हा प्रकार साई श्रद्धा वॉशिंग सेंटर या ठिकाणी घडल्यानंतर पोलिसांनी अजय उंबरकर नामक इसमाला अटक केली आहे.

जोगेश्वरी येथील कार आणि बाईक वॉशिंग सेंटर येथे घडली. या वॉशिंग सेंटरमध्ये तीन दिवसांपूर्वी उंबरकर हा मजुरी करणाऱ्या शंकरला भेटला. त्याने शंकरला वॉशिंग सेंटरमधील पाण्याची टाकी साफ करण्याचे काम दिले. त्यानंतर ते अजयसोबत निघून गेले असे अधिकाऱ्याने सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास पाण्याची टाकी साफ करत असतानाशंकरच्या पत्नीने आरडाओरडा ऐकला. बेशुद्धावस्थेत शंकरला जोगेश्वरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.

अधिक चौकशीत शंकर हा रमेश नावाच्या अन्य एका व्यक्तीसोबत टाकी साफ करत असल्याचे समोर आले. शंकर टाकीच्या आत असताना रमेश साफसफाईच्या यंत्राला जोडलेली सुरक्षा दोरी धरून बाहेर उभा राहिला. अचानक, टाकीच्या भिंतीला विजेचा धक्का लागल्याने शंकर प्रचंड थरथर कापायला लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला, असे अधिकाऱ्याने सांगितले." घटनेनंतर जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शंकरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. तपासाअंती उंबरकरला अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 

Web Title: Electrocution death, one arrested; The incident happened while cleaning the water tank 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज