पालघर/वसई/ठाणो : मुंबई व ठाणो जिल्ह्यातील सगळ्यात जुन्या असलेल्या आणि मच्छी निर्यात व विक्रीसाठी प्रमुख मानल्या जाणा:या ससून डॉकमध्ये जोर्पयत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा लावला जात नाही तोर्पयत तेथे मच्छी विक्रीस न्यायची नाही असा निर्धार मच्छीमारांनी केल्यामुळे त्याचा फटका ठाणो आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनाही बसतो आहे. हे मच्छिमार प्रामुख्याने स्त्रिया आणि लहान प्रमाणात मासेमारी करणारे असल्याने त्यांचे या संघर्षात मोठे नुकसान होते आहे.
सर्व प्रकारच्या मच्छींचे मोठेमोठे लिलाव आणि लहान प्रमाणातील खरेदी विक्री येथे होते. परंतु खरेदी करणारे मच्छीचे वजन करण्यासाठी तोलकाटे वापरतात. त्याच्या अचूकतेबाबत संशय आल्याने काही तोलकाटय़ांची तपासणी केली असता त्यात 3 ते 4 किलोची दांडी 4क् किलोच्या प्रत्येक वजनामागे मारली जाते, असे आढळून आल्याने मच्छीमारांनी व्यापारी आणि मच्छीमार या दोघांच्याही व्यवसायिक हिताच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक वजनकाटे लावण्याचा आग्रह धरला. तो व्यापारी आणि लिलाववाले यांनी न जुमानल्याने शेवटी मच्छिमारांना येथे मासे विक्रीस न आणण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाची माहिती अनेक मच्छीमारांना नसल्याने त्यांची सध्या येथे मच्छी विक्रीस आणल्यानंतर कोंडी होते आहे. त्यामुळे याबाबतचा वादंग मत्स्योद्योग विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने सोडवावा अशी मच्छिमारांची मागणी आहे. त्यांनी त्या दृष्टीने प्रय} न केल्यास विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे व मच्छीमारांचे नेते अनंत तरे यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. (विशेष प्रतिनिधी)