एलिफंटा लखलखणार ! ७० वर्षांत प्रथमच बेटावर पोहोचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:19 AM2018-01-26T02:19:28+5:302018-01-26T02:19:42+5:30

जागतिक वारसा लाभलेल्या देशातील १७ सौंदर्यस्थळांपैकी एक असलेल्या एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे सत्तर वर्षांनंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळेच आता लवकरच एलिफंटा लेणी विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने लखलखणार आहे. याच पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावरील ९५० कुटुंबाना वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचा विकास करता येणे शक्य होणार आहे.

 Elephanta will fly! The electricity reached the island for the first time in 70 years | एलिफंटा लखलखणार ! ७० वर्षांत प्रथमच बेटावर पोहोचली वीज

एलिफंटा लखलखणार ! ७० वर्षांत प्रथमच बेटावर पोहोचली वीज

googlenewsNext

मुंबई/उरण : जागतिक वारसा लाभलेल्या देशातील १७ सौंदर्यस्थळांपैकी एक असलेल्या एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे सत्तर वर्षांनंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळेच आता लवकरच एलिफंटा लेणी विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने लखलखणार आहे. याच पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावरील ९५० कुटुंबाना वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचा विकास करता येणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाने घारापुरी बेटाचा विकास करण्यासंबंधीची जबाबदारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपवली होती. प्राधिकरणातर्फे कंपनीस बेटावर पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठीचे अंदाजपत्रक देण्यासंबंधी कळवले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाने एलिफंटा लेणी विद्युतीकरण करण्याकरता समुद्रतळापासून मरिन केबल तसेच घारापुरी बेटावरील विद्युतीकरणासाठी लागणाºया साहित्याचा २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविला. त्यापैकी १८.५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली आहे. विद्युतीकरणाच्या कामात प्रामुख्याने २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१ अतिरिक्त केबल) समुद्राखालून सात किलोमीटर टाकण्याचे काम करण्यात आले. त्याची यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, महावितरणने केलेल्या कामाची पाहणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी एलिफंटा बेटावर जाऊन केली. या वेळी त्यांच्यासोबत ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या बेटावर वीज पोहोचवण्याचा निश्चय केला होता. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या दिशेने प्रयत्न केले. त्यामुळे या बेटावर वीज नेणे शक्य झाले. यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त के ले आहे.
१८.५ कोटींच्या खर्चास मंजुरी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाने एलिफंटा लेणी विद्युतीकरण करण्याकरता समुद्रतळापासून मरिन केबल तसेच घारापुरी बेटावरील विद्युतीकरणासाठी लागणाºया साहित्याचा २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविला. त्यापैकी १८.५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली आहे.
मैलाचा दगड ठरणार
या बेटावर सध्यस्थितीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत डिझेलद्वारे जनरेशन करून वीजपुरवठा करण्यात येतो. त्याचा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येतो. बेटामध्ये पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण केल्यास स्थायी स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध होऊन पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून तो मैलाचा दगड ठरणार आहे.
कामासाठी २.५ कोटींचा खर्च
महावितरणमार्फत घारापुरी बेटास या सबमरिन केबलमार्फत देण्यात आलेला हा वीजपुरवठा पनवेल विभागातील टी. एस. रेहमान या उपकेंद्रातून देण्यात आला आहे.
घारापुरी बेटावर विद्युत पुरवठा देण्यासाठी ७.५ कि.मी.ची २२ केव्ही उच्चदाब वीजवाहिनी, २०० केव्हीचे तीन ट्रान्सफॉर्मर (रोहित्र), ३.५ कि.मी. लघुदाबाची वाहिनी व इतर लघुदाब वितरण वाहिन्या इत्यादी कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
कामासाठी २.५ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. घारापुरी येथे तीन ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बसवण्यात आले असून, यामध्ये शेतबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक १००), मोराबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक ५०) व राजबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक १००) यांचा समावेश होतो.
यापैकी शेतबंदर व मोराबंदर येथील ९६ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी करता अर्ज व पैसे जमा केले आहेत. या अनुषंगाने विद्युत मीटर बॉक्स लावण्याचे काम सुरू आहे.

Web Title:  Elephanta will fly! The electricity reached the island for the first time in 70 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.