- सुशांत मोरे, मुंबई
सध्याच्या लोकल सेवेवरील ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर बहुचर्चित वांद्रे-विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) मार्गी लावण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल नुकताच रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार एलिव्हेटेड प्रकल्पात १८ स्थानके असून, त्यात ५ भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. १६ हजार ३६८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम २0१७पासून सुरू होईल, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. एलिव्हेटेड प्रकल्पालाच समांतर असलेला कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्प आणि एलिव्हेटेड प्रकल्पाला मिळत नसलेली जागा पाहता चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प अडकून पडला होता. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुंबई रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर चर्चा केली. या वेळी चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पश्चिम रेल्वेचा एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. दोन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, सुरुवातीला वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाईल. वांद्रे ते विरार प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल नुकताच रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला. प्रकल्पात १८ स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये वांद्रे टर्मिनस तसेच विरार दक्षिण व विरार उत्तर अशीही नवीन स्थानके असल्याची माहिती देण्यात आली. १८ स्थानकांत ५ भूमिगत स्थानके, ८ एलिव्हेटेड स्थानके आणि सध्याच्या लोकल सेवेला समांतर ५ स्थानके असतील. वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी आणि बोरीवली ही स्थानके एलिव्हेटेड असणार आहेत. या कामाला २0१७ साली सुरुवात केली जाणार असून, २0२२मध्ये त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.प्रकल्पाचा खर्च १६,३६८ कोटी रुपयेएलिव्हेटेड प्रकल्पासाठी १६ हजार ३६८ कोटी रुपये खर्च करण्यात आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत १९ हजार ५२ कोटी रुपयांपर्यंत खर्च जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. अशी असतील नवी स्थानके वांद्रे : समांतर, वांद्रे टर्मिनस : भूमिगत, सांताक्रुझ : भूमिगत, विलेपार्ले : भूमिगत, अंधेरी : भूमिगत, जोगेश्वरी : समांतर, गोरेगाव : एलिव्हेटेड, मालाड : एलिव्हेटेड, कांदिवली : एलिव्हेटेड, बोरीवली : भूमिगत. दहिसर : एलिव्हेटेड, मीरा रोड : समांतर, भार्इंदर : एलिव्हेटेड, नायगाव : समांतर, वसई रोड : एलिव्हेटेड, नालासोपारा : एलिव्हेटेड, विरार (दक्षिण) : एलिव्हेटेड, विरार (उत्तर) : समांतरया प्रकल्पासाठी लागणारी जागाकायमस्वरूपी जागाचौरस मीटरशासकीय जमीन१,0३,0६३ चौ. मीटरखाजगी जागा३२,५४२ चौ. मीटरडेपो३,00,000 चौ. मीटररेल्वे बांधकाम२६,७0४ चौ. मीटरकाम २0१७पासून सुरू केले जाईल, ते २0२२पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.