मुंबई : मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर सुविधांचे जाळे निर्माण करतानाच राज्यातील रेल्वेमार्गांसाठी भूसंपादनाच्या कामाला गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.सीएसटी-पनवेल, चर्चगेट-विरार कॉरिडॉर मार्ग, विविध स्थानकांतील एलिव्हेटेड कॉरिडॉरची कामे, हायस्पिड रेल्वे, ओव्हर ब्रिजेस, रेल्वे स्थानकांवरील सोयीसुविधा तसेच इन्टीग्रेटेड टिकेटिंग सिस्टिम सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम या वेळी निश्चित करण्यात आला. वर्षभरात बव्हंशी कामे दृष्टीपथात यावीत, असे निर्देशही देण्यात आले.रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वे लाइन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील अनेक मार्गांवर नव्याने रेल्वे लाइन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी सिडको, मुंबई विकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.याच आढावा बैठकीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सादर केलेल्या सादरीकरणातून मुंबई शहर व परिसरातील सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रत्येक प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी घेतली.तिसरी रेल्वे लाइन टाकणारअहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-बल्लारशाह, कल्याण-कसारा, भुसावळ-जळगाव, पुणे-मिरज लोणावळा, मनमाड-जळगाव, वर्धा-नागपूर, गोरेगाव-बोरीवली, बोरीवली-विरार, कल्याण-आसनगाव कल्याण-बदलापूर, पनवेल-कर्जत, रोहा-वीर या मार्गावर दुसरी आणि तिसरी रेल्वे लाइन टाकणे तसेच बेलापूर-सीवूड-उरण या नव्या रेल्वे कामाबाबतचे भूसंपादन, पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनन्स आणि खारकोपर-उरण या १४.५ किलोमीटरच्या लांबीसाठी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली.
एलिव्हेटेड मार्ग, हायस्पिड रेल्वे, पुलांच्या कामांना गती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 5:16 AM