Join us

राज्यात वर्षभरात रस्ते अपघातात साडेअकरा हजार नागरिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

गतवर्षात दुर्घटनेत २४ टक्के घटजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ...

गतवर्षात दुर्घटनेत २४ टक्के घट

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये गतवर्षात मोठी घट झाली आहे. सरत्या वर्षात २४ हजार ९७१ अपघात झाले असून, त्यामध्ये ११ हजार ५६९ जण ठार झाले आहेत. २०१९च्या तुलनेत गेल्या वर्षीच्या अपघातात तब्बल २४ टक्के घट झाली आहे. अर्थात त्याला प्रमुख कारण कोरोनामुळे लागू असलेली संचारबदी आणि निर्बंध हे होते. राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत २४ हजार ९७१ अपघात झाले. त्यामध्ये एकूण ११ हजार ५६९ जण ठार झाले आहेत. २०१९ मध्ये त्याचे प्रमाण अनुक्रमे ३२,९२५ व १२,७८८ इतके होते. पूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्षांतील अपघातामध्ये एकूण २४ टक्के, तर त्यात मृत्यू होण्याच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्यावर्षी २३ मार्च ते ऑगस्ट या कालावधीत संचारबदी लागू होती. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध लागू होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी असल्याने आपसूकच अपघाताचे प्रमाणही कमी राहिले. राज्यात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण १ लाख २९ हजार ६६३ अपघात झाले आहेत. त्यामध्ये एकूण ५० हजार १२९ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

(उद्याच्या अंकात :एन एच-६ बनतोय मृत्युचा सापळा) -----------------

चार वर्षांतील राज्यातील अपघात आणि मृत्यू

वर्ष अपघात मृत्यू

२०१७ ३६,०५६ १२,५११

२०१८ ३५,७११ १३,२६१

२०१९ ३२,९२५ १२,७८८

२०२० २४,९७१ ११,५६९

एकूण। १,२९,६६३ ५०,१२९ -----------------------------------

कोरोना महामारीमुळे कर्फ्यु लागू असल्याने गेल्या वर्षात वाहतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, अपघाताचे प्रमाण टाळणे आणि जखमींना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध उपाय राबविले जात असल्याने त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय ( अपर महासंचालक, राज्य महामार्ग वाहतूक विभाग)