लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता जाहीर होणार असून दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना यामुळे अखेर दिलासा मिळेल.यादी जाहीर झाल्यानंतर यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे त्यांनी संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन १३ ते १५ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत.मुंबई विभागातून गुणवत्ता यादीमध्ये १ लाख ८५ हजार ४७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नोंदणी केलेल्या १ लाख ८५ हजार ४७३ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १ लाख १७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ ४९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी विज्ञान तर १७ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली आहे.ंूकोट्यातील जागाही होणार जाहीरअकरावी प्रवेशाच्या कोटानिहाय जागाही शुक्रवारी जाहीर होणार असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. अकरावी प्रवेशादरम्यान खुल्या वर्गाशिवाय इनहाउस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक अशा कोट्यातून प्रवेश होत असल्याने या जागांची माहिती विद्यार्थी, पालकांना उपलब्ध झाल्यास प्रवेशाच्या वेळी मदत होते. मात्र, अद्याप त्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र शुक्रवारी या जागाही जाहीर होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता सतावत आहे. कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल, हा प्रश्न अद्यापही त्यांच्यासाठी अनुत्तरीत आहे. मात्र आज अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याने त्यांची अनेक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपेल.
अकरावी प्रवेश; पहिली गुणवत्ता यादी आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 6:35 AM