Join us

अकरावी प्रवेश; १ लाखाहून अधिक नावनोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:53 IST

दहावीचा निकाल आज जाहीर होणार असून अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली आहे.

मुंबई : दहावीचा निकाल आज जाहीर होणार असून अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत मुंबई विभागात ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व प्रकारच्या बोर्डाच्या एकूण ११ लाख ३६ हजार २१ विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरून अर्जाचा भाग एक भरण्यासाठी नोंदणी केली आहे, तर अर्जातील भाग दोन दहावीच्या निकालानंतर भरता येणार आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे मुंबई विभागातील ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर धावपळ होऊ नये, यासाठी समितीतर्फे अर्जातील भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ११ लाख ३६ हजार २१ विद्यार्थ्यांनी वेबसाइटहून भाग एक भरण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या १ लाख १ हजार ६२० इतकी आहे.सीबीएसई बोर्डाच्या ३ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार १०५ इतकी नोंदविण्यात आली आहे. आयबी आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ४ आणि ७४५ इतकी आहे. एनआयओएस बोर्डाच्या ८७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला असून इतर बोर्डाच्या ११६ विद्यार्थ्यांनी तो भरला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

टॅग्स :विद्यार्थी