नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश संकटात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 01:24 AM2019-05-26T01:24:23+5:302019-05-26T01:24:31+5:30

मुंबई : व्सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाले असून या मंडळाच्या निकालात ९० टक्के गुण मिळवणाऱ्याचे प्रमाण ...

Eleventh admission in named colleges? | नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश संकटात ?

नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश संकटात ?

Next

मुंबई : व्सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाले असून या मंडळाच्या निकालात ९० टक्के गुण मिळवणाऱ्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचा अकरावीचा कट आॅफ दोन ते सहा टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा फटका कसा बसेल यासंदर्भात शिक्षकी भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांची घेतलेली मुलाखत:
अकरावी प्रवेशाच्या चढाओढीचे काय
चित्र यंदा असू शकेल ?
सीबीएसईचे विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी उपलब्ध जागा या प्रमाणात मोठी तफावत आहे. यामुळे या मंडळातील बहुतांश विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या अकरावीच्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. तसेच आयसीएसई मंडळातून अकरावी-बारावी करण्याकडे फारसा ओढा नसल्याने येथील विद्याथीर्ही या स्पर्धेत येतात. परिणामी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर अकरावी प्रवेशासाठी यांची चढाओढ वाढेल. ही चढाओढ प्रामुख्याने नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी असणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोडार्ने दहावीच्या
विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद केल्यामुळे
विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर अन्याय
कसा होईल ?
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना १०० गुणांचा पेपर लिहावा लागत असून त्यांना मिळणारे अंतर्गत २० गुण बंद करण्यात आले आहेत. याउलट सीबीएसईने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ४० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू केले. यामुळे यंदा सीबीएसईच्या निकालात ९०पेक्षा जास्त गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण हे २२ टक्कयांनी वाढले आहे.. त्यामुळे ९०% टक्केपेक्षा जास्त गुण त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची नामंकित महाविद्यालये मिळविण्यात पीछेहाट होते.
>स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य सरकारने काय करावे असे आपणाला वाटते ?
सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात येऊ शकते. २)राज्य मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये इतर मंडळाचं विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांची लेखी गुणांची सरासरी १०० पैकी काढावी. ३)इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्यावा. ४) पुढील वर्षी राज्य सरकारने राज्यमंडळाला आदेश देऊन अंतर्गत गुण पुन्हा बहाल करावेत .

Web Title: Eleventh admission in named colleges?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.