अकरावी आॅनलाइन प्रवेश : प्रवेशासाठी प्रथम येणा-यास प्राधान्य, गट ३ करिता प्राधान्य फेरी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:05 AM2017-08-27T02:05:19+5:302017-08-27T02:05:44+5:30
अकरावी प्रवेशात गोंधळ होऊ नये, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शनिवार, २६ आॅगस्टपासून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे.
मुंबई : अकरावी प्रवेशात गोंधळ होऊ नये, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शनिवार, २६ आॅगस्टपासून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. प्रथम येणा-या प्राधान्याने प्रवेश प्रक्रियेतील गट ३ च्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया शनिवारपसून सुरू झाली.
मुंबई विभागात अकरावीच्या प्रवेशासाठी चार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या, पण या चार याद्यांमध्ये नाव न लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी अथवा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, प्रथम येणाºयास प्रथम प्रवेश फेरी राबविण्यात आली. गट १ आणि गट २ मध्ये असणाºया विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी म्हणजेच, गट ३ च्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे.
२६ आॅगस्ट सकाळी १० वाजल्यापासून २८ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग २ भरावयाचा आहे. या विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यावर, त्यांच्या पसंतीक्रमानुसार, मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संगणीकृत पावतीची प्रिंट आउट घ्यायची आहे. त्यानंतर, २८ आणि २९ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांनी या दोन दिवसांतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आले आहेत.