मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी असंख्य महाविद्यालयांनी नोंदणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना १५ मेपर्यंत नोंदणी करण्याची संधी दिली जाणार आहेअकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीकडे ५०० हून अधिक महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले असून, या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना उपलब्ध जागा आणि नावामध्ये बदल करण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. १५ मेपर्यंतची मुदत असली, तरी त्यापूर्वी महाविद्यालयांनी नोंदणी न केल्यास आणि प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाला, तर त्याला संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य जबाबदार राहतील, असा इशारा उपसंचालकांनी दिला आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नोंदणी १५ मेपर्यंतच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 2:42 AM