अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया , अजूनही २४ हजार ४५२ विद्यार्थी प्रवेशाविना

By स्नेहा मोरे | Published: September 15, 2023 09:51 PM2023-09-15T21:51:55+5:302023-09-15T21:52:20+5:30

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याची मुदत शुक्रवारी संपली.

Eleventh online admission process, still 24 thousand 452 students without admission | अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया , अजूनही २४ हजार ४५२ विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया , अजूनही २४ हजार ४५२ विद्यार्थी प्रवेशाविना

googlenewsNext

मुंबई - मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याची मुदत शुक्रवारी संपली. या प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ४ हजार ६२० विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. नियमित व विशेष फेऱ्यानंतरही अजूनही २४ हजार ५४२ विद्यार्थी प्रवेशाविना आहेत.

पाचव्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या ९५ हजार ५५८ जागांसाठी एकूण ५ हजार ८२९ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ४ हजार ६२० विद्यार्थ्यांना महाविद्यालयात देण्यात आले. ३ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, ३४३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १७६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले होते. त्यातील अनुक्रमे २६४, ११८ आणि ६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चौथ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत पाचव्या विशेष प्रवेश यादीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची पाचवी विशेष प्रवेश यादी जाहीर केली नव्हती.

एकूण महाविद्यालय १०२१
एकूण विद्यार्थी २८८१८२
प्रवेश मिळालेले २६३६४०
रिक्त जागा १४५९५
प्रवेश न मिळालेले २४५४२

Web Title: Eleventh online admission process, still 24 thousand 452 students without admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.