अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:05 AM2018-05-29T02:05:42+5:302018-05-29T02:05:42+5:30

पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचावेत शिवाय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या मुख्य उद्देशाने राज्य शिक्षण

Eleventh online admission process will be smooth ...! | अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार...!

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार...!

Next

मुंबई : पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचावेत शिवाय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या मुख्य उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना सुलभतेने अकरावी इयत्तेत प्रवेश मिळवून देण्याच्या प्रक्रियेचे सूत्र म्हणजे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया असल्याचे मत मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केले.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे, त्यात कोणते बदल झाले आहेत किंवा आॅनलाइन प्रक्रिया कशी असते, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत. त्यांच्या याच प्रश्नांचे निरसन करण्यासाठी लोकमत व्यासपीठावर मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी संवाद
साधत प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात ३४ ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांची रचना झोननुसार करण्यात आली असून, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना त्या भागाशी संबंधित केंद्रात प्रवेश प्रक्रियेसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरातील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयीची सर्व माहिती त्यांच्या शाळांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यकता भासल्यासच संपर्क साधण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यासाठी मुख्याध्यापकांना विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अर्जांची पडताळणी केल्यावर शाळेने विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग १ मंजूर करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्जाचा भाग २ उघडणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
लॉगइन आयडी, पासवर्ड व कॉलेजच्या कोडसह नमुना प्रवेश अर्ज असणाऱ्या अकरावी माहिती पुस्तिकेची छापील प्रत २५० रुपये देऊन शाळेतून व एमएमआर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावरून मिळवता येणार आहे. या माहिती पुस्तिकेतील लॉगइन आयडी, पासवर्ड वापरून विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग आणि (निकाल लागल्यानंतर) दुसरा भाग भरायचा असल्याची माहिती उपसंचालकांनी दिली. दहावीच्या निकालापूर्वीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती या अर्जामध्ये नोंदवावी लागणार आहे. त्यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांची माहिती घेतलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यानेआपले नाव व दहावीच्या परीक्षेचा क्रमांक टाकल्यानंतर त्याची बहुतांश माहिती प्रक्रियेसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दया माहितीची खातरजमा करून विद्यार्थ्यांनी उर्वरित माहिती भरावी. प्रक्रियेच्या दुसºया टप्प्यामध्ये कॉलेजचे संकेतांक विचारात घेताना, कॉलेजमधील शाखा, प्रकार, गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय यांचा योग्य तो विचार करावा. त्यानुसार कॉलेजांचे संकेतांक स्वतंत्रपणे नोंदवून मगच कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांकांची यादी तयार करावी. कॉलेजांची यादी तयार करताना दहावीला आपल्याला मिळालेल्या मार्कांची टक्केवारी आणि निवडत असलेल्या कॉलेजांचे गेल्या वर्षीचे कट्आॅफ यांचा योग्य तो ताळमेळ साधण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या वर्षीचे कट्आॅफ हे केवळ मार्गदर्शक असतील, याचीही नोंद घ्यावी असे ते या वेळी म्हणाले. द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया या वर्षीपासून आॅनलाइन पद्धतीनेच होणार असून शून्य फेरीमध्ये त्याची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती अहिरे यांनी दिली.
अर्जदार आरक्षणांतर्गत राखीव जागेसाठी अर्ज करत असेल तर त्याने मागासवर्गीय असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या सक्षम अधिकाºयाने दिलेले जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला (शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीची नोंद असणे आवश्यक) सादर करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्याचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जाईल.
आॅनलाइन अर्ज करते वेळी तो मुख्याध्यापकांना पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा, कला व सांस्कृतिक, आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि मुंबई महानगर क्षेत्रात बदलीने आलेल्या राज्य/केंद्र सरकार/खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांचे पाल्य या विशेष आरक्षणातील अर्जदाराने आॅनलाइन अर्ज सादर करताना संबंधित मुख्याध्यापक/मार्गदर्शक केंद्राकडे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या अर्जाचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जाईल, अशी माहिती राजेंद्र अहिरे यांनी दिली. आतापर्यंत आॅनलाइन प्रवेश
प्रक्रियेला विद्यार्थी-पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोमवारपर्यंत ५३,९३५ विद्यार्थ्यांनी आपली
नोंदणी केल्याची माहिती राजेंद्र अहिरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी सायबरमधून अकरावी आॅनलाइनचा अर्ज भरू नये.
विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना (पहिल्या फेरीमध्ये) संबंधित पालिका क्षेत्रातील कोणतेही किमान एक व जास्तीत जास्त दहा कॉलेजांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत.
दुसºया फेरीपासून पसंतीक्रम बदलताना ते कितीही देता येतील.
एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे फक्त एकाच शाखेची मागणी करता येईल. मात्र अर्जातील भाग दोनमधील शाखा बदलून कॉलेज पसंतीक्रम बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
पहिल्या फेरीनंतर विद्यार्थ्यास त्या त्या फेरीसाठी उपलब्ध जागांनुसार पसंतीक्रम बदलता येईल. पसंतीक्रम न बदलल्यास आधीच्या फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहेत.
नियमित प्रवेश फेरीपूर्वी कोट्यातील प्रवेशासाठी शून्य फेरीचे आयोजन केले जाईल. त्यासोबत व्यावसायिक व द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीच्या आरक्षित जागा भरण्यात येतील.

Web Title: Eleventh online admission process will be smooth ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.