अकरावी विशेष फेरीची गुणवत्ता यादी लांबणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत करता येणार प्रवेश निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:50 AM2020-12-25T01:50:08+5:302020-12-25T01:50:31+5:30

admission : बुधवारी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली.

Eleventh special round quality list extended, admission can be done till 31st December | अकरावी विशेष फेरीची गुणवत्ता यादी लांबणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत करता येणार प्रवेश निश्चित 

अकरावी विशेष फेरीची गुणवत्ता यादी लांबणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत करता येणार प्रवेश निश्चित 

Next

मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीच्या जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. बुधवारी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली. याच पार्श्वभूमीवर विशेष फेरीच्या गुणवत्ता यादी व अलॉटमेंटला स्थगिती देण्यात आली.
तिसऱ्या फेरीनंतर मुंबई विभागात अद्याप कोट्याच्या जागा वगळून तब्बल १ लाख ४८ हजार ३८६ जागा रिक्त आहेत. विशेष फेरीची गुणवत्ता यादी २८ डिसेंबरला जाहीर हाेईल. ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रवेश घेतले आहेत, मात्र आता रद्द करायचे आहेत त्यांना या फेरीत ते रद्द करता येतील व लगेचच विशेष फेरीसाठी  अर्ज करता येतील.
मुंबई विभागात अकरावीच्या एकूण ३ लाख २० हजार ३९० जागा उपलब्ध असून तिसऱ्या प्रवेश फेरीअंती आतापर्यंत केवळ १ लाख ३५ हजार ४६६ प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. म्हणजेच तिसऱ्या प्रवेश फेरीनंतर आतापर्यंत मुंबई विभागातून केवळ ४२ टक्के प्रवेशनिश्चिती झाली.

Web Title: Eleventh special round quality list extended, admission can be done till 31st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.