राज्यभर अकरावी प्रवेश ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 07:49 IST2025-03-02T07:48:59+5:302025-03-02T07:49:45+5:30
राज्यभरात सर्वत्र आता अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार आहे.

राज्यभर अकरावी प्रवेश ऑनलाइन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर या ग्रामीण विभागांसह राज्यभरात सर्वत्र आता अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार आहे.
सध्या राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांतील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. यंदा सर्व राज्यभर अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाईल. दहावीचा निकाल प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती शिक्षण उपसंचालकांकडून ऑनलाइन प्रमाणित केली जाते.