मुंबई : मागील 48 दिवसापासून विद्याविहार येथील आंबेडकर नगर मध्ये माहुल वासीयांचे जीवन बचाव आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाचे माहुल वासीयांच्या मागण्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे शनिवारी हजारो प्रकल्पग्रस्त आझाद मैदानात जमून सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आल्या आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्त आणि तानसा जलवाहिनी प्रकल्पात घर गमावलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, माहुलला राहायला आल्यापासून येथील नागरिकांचा प्रदूषणामुळे अनेकांचा जीव गेला, तसेच येथील दूषित वातावरण आणि हवेमुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना आजार जडले आहेत.