विधिमंडळांतील महिला आरक्षणासाठी एल्गार
By admin | Published: July 16, 2017 03:01 AM2017-07-16T03:01:59+5:302017-07-16T03:01:59+5:30
विधिमंडळांत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (माकप) शनिवारी दादर (पू) येथील स्वामी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळांत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (माकप) शनिवारी दादर (पू) येथील स्वामी नारायण मंदिराजवळ चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या महिलाविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
महिला विधेयकाच्या मागणीसाठी शनिवारी माकपच्या वतीने, शनिवारी अखिल भारतीय मागणी दिवसाचे आयोजन करून, देशभरात विविध ठिकाणी निषेध सभा घेण्यात आल्या. दादर येथे झालेल्या सभेमध्ये पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य महेंद्र सिंग, अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या संगीता तांबे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मुंबई अध्यक्ष प्रमिला मांजळकर, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया सेक्रेटरी प्रीती शेखर आदींची भाषणे झाली. महिलांना ३३ टक्के आरक्षण राज्यसभेमध्ये मंजूर झाले असले, तरी लोकसभेमध्ये अद्याप मंजुरी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.