मुंबई : काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने नॅशनल ॲप्टिट्यूट टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) परीक्षेच्या पात्रता नियमांमध्ये बदल केला आहे. पात्रतेचे नियम शिथिल केले आहेत. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी सुधारित निकष जारी करत पाच वर्षे कालावधीच्या बी. आर्क अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशासाठी पात्रतेत सवलत दिली. उमेदवारांना बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा दहावी अधिक तीन वर्षांचा डिप्लोमा गणित या अनिवार्य विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
....................................
नीट पीजीसाठी १,७४,८८६ अर्ज
मुंबई : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या नॅशनल एलिजीबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट पीजी) परीक्षेला एक लाख ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ३० मार्च ही अखेरची मुदत होती. परीक्षेचे आयोजन १८ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा संगणकीकृत असेल. देशभरात विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल.
....................................