प्रवेशपात्रता परीक्षा ५ जून रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:23+5:302021-02-16T04:08:23+5:30

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे ८ वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा ५ जून रोजी पुणे येथे ...

Eligibility test on 5th June | प्रवेशपात्रता परीक्षा ५ जून रोजी

प्रवेशपात्रता परीक्षा ५ जून रोजी

Next

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे ८ वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा ५ जून रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे १५ एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.

--------------

संत सेवालाल महाराज जयंती साजरी

मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त, महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर ॲड. सुहास वाडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जलअभियंता अजय राठोड, महापालिका चिटणीस संगीता शर्मा, निरीक्षक दयाराम आडे तसेच विभागीय कामगार कल्याण अधिकारी दिलीप राठोड हे मान्‍यवर उपस्थित होते.

--------------

कार्यकर्ता, साथी संघटनांचा मेळावा

मुंबई : पाणी अधिकाराच्या संघर्षाची अकरा वर्षे आणि त्यातून मिळालेल्या ऐतिहासिक निवाडे निर्णय आणि त्यातून झालेला सामुदायिक संघर्षाचा विजय दिन साजरा करण्यासाठी पाणी हक्क समितीतर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त १६ फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान या ठिकाणी कार्यकर्ता आणि साथी संघटनांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

--------------

भाषा संवर्धनातील प्रकाशकाच्या भूमिकेचा आढावा

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात प्रकाशक अशोक कोठावळे यांची विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होईल. भाषा संवर्धनात प्रकाशकाची काय भूमिका असते, याचा आढावा या मुलाखतीतून घेतला जाईल.

--------------

अरुण जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते अरुण शामराव जोशी यांची १४ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या अध्यक्षपदी सलग बाराव्यावेळी निवड करण्यात आली. शिवाजी उद्यान, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात रविवारी झालेल्या स्मारकाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अरुण जोशी यांची निवड घोषित करण्यात आली. त्यांची ही निवड बिनविरोध झाली.

--------------

Web Title: Eligibility test on 5th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.