गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती अभियान विनामूल्य

By सचिन लुंगसे | Published: October 6, 2023 08:04 PM2023-10-06T20:04:47+5:302023-10-06T20:05:31+5:30

Mumbai: मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Eligibility verification campaign for mill workers and their heirs free of charge | गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती अभियान विनामूल्य

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती अभियान विनामूल्य

googlenewsNext

मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अद्यापपर्यंत १६९८० गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून कागदपत्र प्राप्त झाली आहेत. त्यापैकी ११,११४ गिरणी कामगारांनी ऑनलाइन पद्धतीने या अभियानात सहभाग घेतला आहे. म्हाडातर्फे राबविण्यात येणारे हे विशेष अभियान विनामूल्य राबविण्यात येत आहे.

१४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या पात्रता निश्चितीच्या या विशेष अभियानास गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून उत्तुंग प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळील समाज मंदिर हॉल, एम.आय.जी क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व),  येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे.

म्हाडामध्ये कागदपत्र सादर करण्यासाठी येणार्‍या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी जमा करण्यास आणलेली कागदपत्रे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेण्यात येत आहेत. याकरिता कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येत नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

या अभियाना दरम्यान असे लक्षात आले आहे की, राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून गिरणी कामगार व त्यांचे वारस पात्रता निश्चितीकरिता कागदपत्र सादर करण्यास म्हाडा मुख्यालयाला भेट देत आहेत. अशा अर्जदारांकरिता मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, कागदपत्रे ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्र सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.

गिरणी कामगार/वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या १३ पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने http://millworkereligibility.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mill worker eligibility या मोबाईल ॲपद्वारे कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. mill worker eligibility  हे ॲप अर्जदार आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयोएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये mill workers eligibility या नावाने उपलब्ध आहे. या माध्यमातून गिरणी कामगार/ वारस अर्जदार कधीही आणि कुठूनही आपली कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करू शकतील व याकरिता त्यांना म्हाडा कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता लागणार नाही.

कमीत कमी वेळेमध्ये पात्रता निश्चिती होणेकरिता मंडळातर्फे एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली (IHLMS 2.0) या  संगणकीय आज्ञावलीच्या सहाय्याने गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेकरिता स्वतंत्र ॲप विकसित केले आहे.  या विशेष अभियानादरम्यान ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने प्राप्त कागदपत्रे कामगार विभागाच्या अधिकार्‍यांकडे गिरणी कामगार/  वारसांच्या पात्रतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने संगणकीय प्रणालीमध्ये जमा कागदपत्रांची पात्रता निश्चिती तुलनात्मकदृष्ट्या लवकर निश्चित होणार आहे.

सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन आपली पात्रता निश्चिती करून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे दर्शविण्यात आलेल्या क्यु आर कोडच्या सहाय्याने गिरणी कामगार व त्यांचे वारस थेट संगणकीय प्रणालीशी जोडले जाऊ शकतात.

 

Web Title: Eligibility verification campaign for mill workers and their heirs free of charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.