गोरेगाव येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना सदनिका मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:05 AM2021-07-04T04:05:54+5:302021-07-04T04:05:54+5:30
मुंबई : गोरेगाव येथील भगतसिंगनगर नंबर २ व लक्ष्मीनगर येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मुंबई महापालिकेला मिळालेल्या ...
मुंबई : गोरेगाव येथील भगतसिंगनगर नंबर २ व लक्ष्मीनगर येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मुंबई महापालिकेला मिळालेल्या सदनिकांमधून उपलब्धतेनुसार सदनिका दिल्या जाणार आहेत.
गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिकेचे पी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त धोंडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या माधवी राणे सहभागी झाले होते.
गोरेगाव, मालाड विभागात डीपी रोड पोईसर नाला रुंदीकरण इत्यादी विविध प्रकल्पांसाठी मागील दोन वर्षांत महापालिकेला एकूण ८०६ प्रकल्पग्रस्त सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून उपलब्ध झाल्या. या सदनिकांपैकी अद्यापपर्यंत वाटप न झालेल्या सदनिकांचे उपलब्धतेनुसार वाटप प्राधान्याने भगतसिंगनगर नंबर २ व लक्ष्मीनगर येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना करण्यात यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.