लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहरातील आपला दवाखाना या उपक्रमाविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचला, तसेच या दवाखान्यांमुळे मुंबई पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील याचा कोणताच परिणाम ओपीडी रुग्णसंख्येयवर जाणवला नाही. उलट या काळात या रुग्णालयातील ओपीडीमध्ये येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. या अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्याची गंभीर दखल पालिका प्रशासनने घेतली. शुक्रवारी या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक मुख्यालयात बोलविण्यात आली. त्यामध्ये आपला दवाखाना संबंधित सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तब्बल ५० कोटी रुपये आपला दवाखानावर या वर्षात खर्च झाले. मात्र, उपनगरातील काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या भागात सध्या सुरू असलेल्या ‘आपला दवाखाना’विषयी तक्रारी केल्या आहेत. अनेकांनी तर आमच्या भागात हा दवाखाना प्रस्तावित केला असून, तो अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही, असे सांगितले आहे, तर काही नगरसेवकांनी औषधाची टंचाई आणि रक्ताच्या चाचण्या सध्या याठिकाणी होत नसल्याचे सांगितले.
‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या सर्व विषयांवर शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत अत्यंत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत सर्व प्रश्नांनुसार आढावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घेतला.
तब्बल ५० कोटी रुपये आपला दवाखानावर या वर्षात खर्च झाले. मात्र, उपनगरातील काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या भागात सध्या सुरू असलेल्या ‘आपला दवाखाना’विषयी तक्रारी केल्या.
जे ६० दवाखाने प्रस्तावित आहेत, त्यांची माहिती घेऊन दोन दिवसांत ते कधी सुरू करणार याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे, तसेच ज्या दवाखान्यांत डॉक्टर गैरहजर असतील, तर त्याठिकाणी रुग्णालयातील डॉक्टर पाठवून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी. त्यासोबत कोणत्या दवाखान्यात औषधे कमी पडत असतील, तर त्याठिकणी लोकल पर्चेसच्या माध्यमातून औषधे उपलब्ध करून द्यावीत, असे आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुख्य रुग्णलायतील ओपीडी, आपला दवाखाना सुरू असतानाही वाढली, याचा अर्थ रुग्णसंख्या वाढतच आहे. -डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, पालिका