मनातील शंका दूर करणार : कोरोनाच्या संशयाला टेलिमेडीसीनचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:55 AM2020-04-18T00:55:09+5:302020-04-18T00:55:19+5:30
मनातील शंका दूर करणार : सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाइन नंबर जारी
मुंबई : लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळतानाच कोरोना झाल्याच्या संशयानेही अनेकांना पछाडले आहे. खोकला, हलकासा ताप किंवा अन्य किरकोळ लक्षणे दिसताच आपल्याला कोरोना तर झाला नसेल ना, या संशयाने लोक अस्वस्थही होत आहे. अशावेळी टेलि-मेडिसीन हेल्पलाइनच्या माध्यमातून आपल्या मनातील शंक दूर करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. या हेल्पलाइनमुळे एकीकडे साशंक मनाला शांत करतानाच आधीच तणावात असलेल्या व्यवस्थेवर आणखी भार वाढणार, असा विश्वास प्रशासनाला वाटतो आहे.
कोरोनाबाबतचा संशय दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून स्व-तपासणीचे आॅनलाईन आणि आॅफलाईन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यात आता हेल्पलाईनची भर पडल्याने हा पर्याय अधिक अचुक बनण्यास मदत होणार आहे. हेल्पलाईन क्रमांक ०९५१३६१५५५० वर कॉल करून नागरिक आपल्या मनातील शंका घरबसल्या दूर करू शकणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे आधीच रुग्णालयांवर ताण पडत आहे. अनेक सामान्य नागरिकांना कोवीडची लक्षणे असल्याचा संशय येत असतो. त्यांची शंका दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी ही टेलिमेडिसीन हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर), ‘टेलीमेड्स कोविड’ ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांनी एकत्र येऊन ‘कोविड-मदत’ ही सेवा सुरू केली आहे.
ज्या नागरिकांना संशय आहे की त्यांना कोविडची लक्षणे आहेत त्यांनी या हेल्पलाईनवर कॉल करावे. त्यावर विचारलेल्या काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यांच्या उत्तरावर आधारित, काही मिनिटांतच त्यांना डॉक्टरांकडून कॉल-बॅक मिळेल आणि ते कोविडबाधित आहेत की त्यांना इतर आजार असू शकतील, याबद्दल त्यांच्याशी हे डॉक्टर दूरध्वनीवरून चर्चा करतील. या टेलिमेडिसीन हेल्पलाईनवर मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये संवाद साधता येणार आहे. तसेच ज्यांना कोवीडची लागण झाली असल्यास त्यांची माहिती आरोग्य विभागाकडे जाते व तेथून कोरोनाबाधित व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करण्याची कारवाई करण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व इतर आजार असलेल्या नागरिकांनाही या यंत्रणेमार्फत योग्य ती मदत केली जाते.
हेल्पलाइनवर सेवेसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची नोंदणी
कोवीड मदत या हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. राज्यातील नागरिकांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून योग्य तो सल्ला देण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमात डॉक्टरांनी ु्र३.’८/ूङ्म५्रेिंंि३ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. कोवीडविरुद्धच्या या लढ्यात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.