एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आली जाग : महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ गार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:54 AM2017-12-01T05:54:33+5:302017-12-01T05:54:48+5:30

: एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरील प्रवासी गर्दीचे नियोजन करण्याचे महत्त्व रेल्वे प्रशासनाला समजले. दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने ९आता गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणूक करण्याचा निर्णय

 Elphinston accident: 251 guards of Maharashtra's security forces | एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आली जाग : महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ गार्ड

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आली जाग : महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ गार्ड

Next

 मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरील प्रवासी गर्दीचे नियोजन करण्याचे महत्त्व रेल्वे प्रशासनाला समजले. दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने ९आता गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात २५१ गार्ड आणि ८ पर्यवेक्षकांना मध्य रेल्वेत सहभागी करुन घेतल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केली.
सीएसएमटी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाव्यवस्थापक शर्मा यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे व्यवस्थापक संजय बर्वे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे महानिरीक्षक अतुल श्रीवास्तव उपस्थित होते. नाशिक येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात जवानांना प्राथिमक प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी स्थानकातील पादचारी पूल-फलाट येथे गार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील सुरक्षेसंबंधी कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. कायदेभंग करणाºया प्रवाशांना पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे पोलीस यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांमुळे रेल्वेच्या सुरक्षेला बळ मिळेल, असा विश्वास महाव्यवस्थापक शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title:  Elphinston accident: 251 guards of Maharashtra's security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई