एल्फिन्स्टन दुर्घटना: मृत महिलेच्या अंगावरील दागिन्याची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 02:37 PM2017-09-30T14:37:34+5:302017-09-30T15:12:21+5:30

 शुक्रवारी परळ-एल्फिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

Elphinstone Accident: Jewelry Theft of a Dead Woman | एल्फिन्स्टन दुर्घटना: मृत महिलेच्या अंगावरील दागिन्याची चोरी

एल्फिन्स्टन दुर्घटना: मृत महिलेच्या अंगावरील दागिन्याची चोरी

Next
ठळक मुद्दे शुक्रवारी परळ-एल्फिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये इतर प्रवासी धावपळ करत होते.

मुंबई-  शुक्रवारी परळ-एल्फिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये इतर प्रवासी धावपळ करत होते. या घटनेमध्ये एका बाजूला माणुसकी दिसत होती पण दुसऱ्या बाजूला मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार घडला. तोच प्रकार आता समोर आला आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने चोरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुभलता शेट्टी यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या नसल्याचं लक्षात आलं. सोशल मीडियात फिरणाऱ्या एका छायाचित्रात एक जण सुमलता यांच्या हातातील बांगड्या काढून घेताना दिसल्याचं ट्विट सुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी केलं आहे. शेट्टी यांनी हा फोटो रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना ट्विट केला. या ट्विटची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे आरपीएफला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

'पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणाऱ्या बांगड्या मिळाल्या नाहीत,” अशी माहिती शुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी दिली. एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला तर 39 प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये शुभलता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.
 

एलफिन्स्टन- परेल पुलावर शुक्रवारी सकाळी नेमकं काय घडलं?

- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.

- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.

- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.

- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.

- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.

- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले

- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली

- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.

- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला

Web Title: Elphinstone Accident: Jewelry Theft of a Dead Woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.