कुलदीप घायवट मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या पायºयांवर झालेल्या दुर्घटनेला आता एक महिना पूर्ण झाला; मात्र अद्यापही रेल्वे प्रवाशांच्या मनावर झालेला दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. रेल्वे प्रशासनाला दुर्घटनेनंतर जाग आली असली तरी प्रत्यक्षात आजही सर्वच रेल्वे स्थानकांवर सेवा-सुविधा अपूर्ण आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासह प्रवाशांना पुरेशा सेवा-सुविधा मिळतील, अशी आशा रेल्वे प्रवाशांना आहे. प्रवाशांच्या आशेला रेल्वे प्रशासन कितपत खरे उतरेल; हे भविष्यात दिसेलच. परंतु मुंबईची खरी गरज आहे ती रेल्वे स्थानकावरील गर्दीच्या व्यवस्थापनाची. लोकलची संख्या वाढविण्यासह लोकल फेºया वाढविण्याची. रेल्वेचा उन्नत प्रकल्प जेव्हा उभा राहायचा तेव्हा राहील, बुलेट टेÑन येईल तेव्हा येईल; मात्र किमान आजमितीस उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवांचा दर्जा वाढविण्यात यावा, असे प्रामाणिक मत मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी मांडले आहे.येथे पादचारी पूल उभारणारमध्य रेल्वे - दादर, मुलुंड, अंबिवली, टिटवाळा, वासिंद, आटगाव, कसारा, उल्हासनगर, वडाळा रोड, टिळकनगर, कुर्ला, गोवंडी, विक्रोळी, विद्याविहार, करी रोड आणि चिंचपोकळी पश्चिम रेल्वे - लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, माटुंगा रोड, सांताक्रुझ, गोरेगाव, कांदिवली, भार्इंदर, वांद्रे, मालाड, कांदिवली-बोरीवली पोईसर नाला, खार, विरार.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारावर सर्व स्तरांतून टीका झाली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आता बास’ ही वृत्तमालिका हाती घेतली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गाच्या स्थानकांवरील समस्यांचा पाढा वाचत ‘लोकमत’ने रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. रेल्वे प्रवाशांनीही ‘आता बास’ या वृत्तमालिकेला साथ देत आवाज उठविला आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने समस्यांची दखल घेत प्रवासी सुरक्षिततेनुरूप बदल करण्यास सुरुवात केली असतानाच सर्वच स्तरांतून ‘लोकमत’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आज या वृत्तमालिकेचा समारोप करत आहोत.
रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे गरजेचे आहे. स्थानकांवर जादा तिकीट खिडकी वाढवणे गरजेचे असून प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजेत.- प्रज्ञा मोरे, प्रवासीनियोजनबद्ध पद्धतीने काम करणे अत्यावश्यक आहे. मध्य आणि पश्चिम स्थानकाला जोडणाºया पुलाची रुंदी वाढवावी. शक्य असल्यास नवीन तंत्रप्रणाली आणून नवीन पद्धतीने मार्ग तयार करणे गरजेचे आहे.- शारोन राजन, प्रवासीपुलाचे रुंदीकरण गरजेचे आहे. प्रवाशांच्या गरजा जाणून त्या पूर्ण करणे रेल्वेचे काम आहे.- गायत्री सावंत, प्रवासीसरकारतर्फे देण्यात आलेली आश्वासने लोक पूर्ण होण्याची वाट बघत बसतात. दुर्घटनेनंतर ताबडतोब ठोस पावले उचलणे गरजेचे होते. पण तसे काही झाले नाही. पूल व जिने यांची रुंदी वाढवणे अत्यावश्यक आहे. - अर्जुन बढे, प्रवासीसरकारने बुलेट ट्रेनपेक्षा लोकल रेल्वे सुधाराव्यात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या प्राथमिक सोयी-सुविधांकडे लक्ष देऊन त्यानुसार काम करणे गरजेचे आहे. जादा लोकल वाढवाव्यात. नवीन पूल बनवण्याची गरज आहे.- चाणक्य जेटवा, प्रवासीकंपन्या वाढल्याकारणाने गर्दीचे प्रमाण वाढलेले आहे. गर्दीचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुलाची बांधणी करणे, जिन्याची रुंदी वाढवण्याची गरज आहे. फेरीवाले उठले आहेत. त्यामुळे स्थानक परिसर मोकळे झाले आहेत. - विजय पाटील, प्रवासीआरामदायी प्रवास कशाप्रकारे करता येईल, यावर विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.- महावीर हरिजन, प्रवासीमयूरेश हळदणकरचे कुटुंबीय या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. मयूरेश एकुलता एक मुलगा होता. महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत तो नोकरी करून वडिलांना हातभार लावत होता. मयूरेशच्या कुटुंबीयांना रेल्वे आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले आहेत. परंतु मयूरेशच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याची आई नेहमी आजारी असते. त्यामुळे मयूरेशच्या मोठ्या बहिणीला रेल्वेत एखादी नोकरी मिळावी, अशी मयूरेशच्या कुटुंबीयांची आणि मित्र परिवाराची मागणी आहे.- तुषार कदम, मृत मयूरेषचा मित्रएल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत माझ्या पत्नीला मुका मार लागला होता. रुग्णालयाचे उपचार विनामूल्य करण्यात आले आणि शासनाकडून पन्नास हजार रुपयांची मदतही मिळाली आहे. परंतु माझी पत्नी अद्याप बरी झालेली नाही. एक महिना उपचारानंतर आता ती चालू लागली आहे. नीट हालचाल करता येत नसल्याने अद्याप ती कामावर रुजू होऊ शकलेली नाही.- सचिन सावंत, जखमी अपर्णा सावंत यांचे पती
मध्य रेल्वेफेरीवाले आणि पादचारी पूल हे समीकरण मुंबईत पाहायला मिळते. पण प्रश्नाची कित्येक वर्षांनी महिन्याभरात खºया अर्थाने दखल घेण्यात आली. रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यातील हद्दीच्या वादात सामान्य प्रवासी चिरडला जात होता. मात्र दोन्ही प्रशासनांनी समन्वय साधत एकत्र बैठक घेतली. यात एकत्र कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेसह महापालिका हद्दीतील १५० मीटर क्षेत्र हे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेने २४ वॉर्डच्या अधिकाºयांची नियुक्ती केली. फेरीवाल्यांवर आकारण्यात येणाºया दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय झाला. पादचारी पूल हा घटक दुर्घटनेपूर्वी प्रवासी सुविधा या प्रकारात गणला जात होता. मात्र घटनेनंतर पादचारी पुलाचा समावेश स्थानक अनिवार्य बाबींमध्ये करण्यात आला. महाव्यवस्थापकांना १८ महिन्यांसाठी सुरक्षेसंबंधी विशेषाधिकार देण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवर १६ ठिकाणी पादचारी पुलाची तरतूद करण्यात आली. यापैकी १२ स्थानकांवर नवीन आणि ४ स्थानकांवरील पादचारी पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही सर्व स्थानकांत कार्यान्वित करणार येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर एकूण २ हजार ७०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल ११४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पादचारी पुलांसाठी २४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्यासाठी सर्व संबंधित अधिकाºयांच्या कक्षात जोडणी देण्यात यावी. यात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलीस ठाणे, स्टेशन मास्टर या कार्यालयांचा समावेश आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सर्व बोगींमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत, तर स्थानकावरही सीसीटीव्ही जाळे उभारण्यात येणार आहे.महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा १५ महिन्यांत सुरू करणार. पादचारी पुलावर दिशादर्शक फलक बसवणार आहेत. चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यांन विविध टप्प्यांत एकूण १७.५ किलोमीटर सुरक्षा भिंत उभारण्यात यावी, पादचारी पूल व स्थानकांतील मोकळ्या जागांसाठी सुविधा केंद्र, चेक ड्रॉप बॉक्सची जागा बदलणे आणि पादचारी पुलावरील वाय-फाय सेवा बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘उच्चस्तरीय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये मध्य रेल्वे व्यवस्थापक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, पोलीस आयुक्त दता पडसलगीकर, मध्य विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन, पश्चिम विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन, मुख्य सुरक्षा आयुक्त ए.के. श्रीवास्तव यांचा समावेश आहे.पत्री पुलाजवळ ३० मीटरच्या उड्डाणपुलाचे नियोजनमध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत-कसारा दरम्यान रुळांच्या क्रॉसिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग कामाला गती मिळणार आहे. पत्री पुलाजवळ कसारा दिशेला ३० मीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. परिणामी पत्री पुलाजवळील अनिश्चित लोकल थांबा कायमचा रद्द होणार आहे.सुरक्षेसंबंधी सर्वाधिकार महाव्यवस्थापकांना १८ महिन्यांसाठी देण्यात आले आहेत. यामुळे महाव्यवस्थापकांच्या अखत्यारीत असलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. यापैकी काही पादचारी पुलांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात निविदा खुलणार आहे. उर्वरित कामांचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. १५ दिवसांच्या आत त्याला मंजुरी मिळत असल्याने कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. मार्च २०१८ अखेर पाच पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.- रवींद्र भाकर,मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेतील सर्व स्थानकांची पाहणी झालेली आहे. स्थानकांतील प्रवासी गर्दीनुसार सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. स्थानकातील एक पादचारी पूल असलेल्या स्थानकात सर्वप्रथम पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. विविध विकासकामांना त्वरित मंजुरी मिळत असल्याने सर्व स्थानके येत्या काळात प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित होणार आहेत.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे