एल्फिन्स्टन दुर्घटनेतील प्रवाशांना घरपोच पैसे, प्रतिमा जपण्यासाठी प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:13 AM2017-10-05T05:13:05+5:302017-10-07T14:25:08+5:30

एल्फिन्स्टन दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली.

Elphinstone Crash Roads to run at home, money is being run by the administration | एल्फिन्स्टन दुर्घटनेतील प्रवाशांना घरपोच पैसे, प्रतिमा जपण्यासाठी प्रशासनाची धावपळ

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील प्रवाशांना घरपोच पैसे, प्रतिमा जपण्यासाठी प्रशासनाची धावपळ

Next

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. तसेच रेल्वे अधिकाºयांनी ‘व्हीआयपी’ कल्चरमधून बाहेर पडून काम करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर ‘अ‍ॅक्शन’मध्ये आलेल्या रेल्वे प्रशासनाने एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि जखमींना घरी जाऊन आर्थिक मदत दिली. यामुळे जनसामान्यांमधील प्रतिमा पुन्हा उजळवण्यासाठी पश्चिम रेल्वे अधिकारी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २३ प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत घोषित केली. मृत प्रवाशांसह जखमी प्रवाशांना नुकसानभरपाई म्हणून घोषित केलेली रक्कम पश्चिम रेल्वे प्रशासनाने दुर्घटनेच्या २४ तासांच्या आत देण्यास सुरुवात केली. मृत प्रवाशांपैकी २२ प्रवाशांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत धनादेशच्या माध्यमाने देण्यात आली आहे. ३४ जखमींनादेखील मदतीची रक्कम देण्यात आली.
जखमींना मदत करण्यासाठी पश्चिम रेल्वे विभागाकडून अधिकाºयांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सातारा, पुणे, अलाहाबाद असा प्रवास करून दुर्घटनेतील पीडितांना मदत केली आहे. काही प्रवासी मुंबईत राहत नसल्यामुळे त्यांच्या मूळ गावी जाऊन मदत करण्यात आली आहे. एक कोटी २९ लाख १५ हजार रुपयांची मदत दुर्घटनेतील पीडितांना देण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
पूर्वी कोणताही अपघात झाल्यास त्यातील जखमी प्रवाशांना नुकसानभरपाई त्वरित घोषित करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी बराच कालावधी जात होता. दुर्घटनेच्या दिवशी रेल्वेमंत्र्यांचा पूर्वनियोजित मुंबई दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर झालेल्या मॅरेथॉन बैठकीत दुर्घटनेसह अन्य बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेमध्ये असलेला रोषामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्वरित टीम तयार करून पथके रवाना केली. प्रवाशांना घरपोच मदत योग्य आहे. मात्र अपघात टाळण्यासाठी विशेष प्रयत्न पश्चिम रेल्वे भविष्यात करेल, असा विश्वास रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता समीर झवेरी यांनी व्यक्त केला आहे.

पूल नहीं ‘फूल’ गिरा
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेत नवीन बाजू समोर आली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या शिल्पा विश्वकर्मा या १९ वर्षीय तरुणीने दुर्घटनेच्या दिवशी फूल पडल्याचे पाहिले. मात्र गर्दीत ‘पूल गिरा पूल गिरा’ अशी अफवा पसरली आणि दुर्घटना घडली. पोलिसांनी नोंदवलेल्या चार जबाबांमध्येदेखील या घटनेला दुजोरा मिळाला आहे. डोक्यावरुन फुलांचा बोजा वाहणाºया वाहकाच्या डोक्यावरील बोजा खाली पडला. गर्दीतील लोकांमध्ये फूल ऐवजी पूल पडला अशी अफवा उठली, अशी माहिती विश्वकर्माने रेल्वे चौकशी समितीसमोर दिली.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने धावपळ सुरू केली असून एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने घरपोच पैसे पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Web Title: Elphinstone Crash Roads to run at home, money is being run by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.