‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:51 AM2018-01-23T03:51:53+5:302018-01-23T03:52:12+5:30
एल्फिन्स्टन स्थानकातील लष्करी पादचारी पुलाचा पहिला गर्डर २६ जानेवारीला उभारण्यात येणार आहे. तीन दिवस पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू राहणार आहे.
महेश चेमटे
मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकातील लष्करी पादचारी पुलाचा पहिला गर्डर २६ जानेवारीला उभारण्यात येणार आहे. तीन दिवस पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू राहणार आहे. प्रजासत्ताक दिन, त्याला जोडून येणारा शनिवार आणि रविवार यामुळे सुट्ट्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे लोकल फेºयांवर कमी परिणाम होणार असल्याने पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेनेदेखील २६ ते २८ जानेवारी रोजी पुलाच्या कामाला मंजुरी दिली.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील तीन स्थानकांवर लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलाचे काम ११ टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यातील एल्फिन्स्टन पुलाच्या गर्डर उभारणीचे काम तीन भागांत होईल. गर्डरचा पहिला भाग २६ जानेवारी रोजी उभारण्यात येईल. यासाठी पश्चिम रेल्वेवर २६ जानेवारी रोजी ब्लॉक असेल. २७ आणि २८ जानेवारी रोजी अनुक्रमे दुसºया आणि तिसºया गर्डरची उभारणी करण्यात येईल. परिणामी शनिवार-रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक किती तासांसाठी, कोणत्या मार्गावर असेल, याबाबत लवकरच तपशील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
करी रोड स्थानकातील लष्करी पुलाच्या पायाभरणीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. करी रोडमधील जागेच्या वादामुळे कामाला विलंब झाला. त्यामुळे करी रोड स्थानकातील पुलाचे गर्डर उभारण्यासाठी ३१ जानेवारी किंवा ४ फेब्रुवारी यापैकी एक तारीख निश्चित करण्यात येईल.