Join us

आजपासून एल्फिन्स्टन रोड नव्हे, ‘प्रभादेवी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:32 IST

मंजूर होऊन तब्बल १२ महिन्यांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

मुंबई : मंजूर होऊन तब्बल १२ महिन्यांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.>२९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी असे करण्यात येणार होते. मात्र त्याच दिवशी दुर्घटना घडल्याने नामांतराचा विषय पुन्हा मागे पडला. अखेर आता १८ जुलैच्या मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. स्थानकातील नावाचे फलक, इंडिकेटर, उद्घोषणा यंत्रणा इत्यादीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच प्रभादेवी स्थानकाचा कोड ‘पी बी एच डी’ असेल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

टॅग्स :एल्फिन्स्टन स्थानकप्रभादेवीरेल्वेपश्चिम रेल्वे