एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:39 PM2017-10-11T14:39:35+5:302017-10-11T16:11:40+5:30

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं आहे. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. 

Elphinstone stampede - clean chit due to torrential rains, railway officials | एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट

Next
ठळक मुद्देएलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होतापश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दुर्घटनेची चौकशी करण्यात आली

मुंबई - एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं आहे. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दुर्घटनेची चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांच्याकडे अहवाल सोपवण्यात आला आहे. तपास करत असताना जखमी झालेल्या 30 प्रवाशांचा जबाब नोंदवण्यात आला होता. यासोबत दुर्घटनेच्या व्हिडीओचीही तपासणी करण्यात आली अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. 

अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे चेंगराचेंगरी झाली. मुसळधार पावसामुळे आधीच पाय-यांवर गर्दी झाली असताना तिकीट खिडकीजवळ असणा-या प्रवाशांनीही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता. प्रवाशांची संख्या वाढत असल्या कारणाने स्थानकावरील गर्दी वाढू लागली होती. जड सामान घेऊन जाणा-या प्रवाशांचा तोल सुटल्याने चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. 

चौकशी अहवालात, शॉर्ट सर्किट झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती नाकारण्यात आली आहे. कोणत्याही साक्षीदाराने शॉर्ट सर्किटमुळे चेंगराचेंगरी झाल्याच्या माहितीला दुजोरा दिलेला नाही. अहवालात गर्दीच्या वेळी प्रवाशांना जड सामान घेऊन वाहतूक करण्यास मनाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच गर्दीच्या वेळी सामाने घेऊन प्रवास करणा-या प्रवासी, मुख्यत: दुकानदारांनाही आळा घातला पाहिजे असं अहवालात सांगण्यात आलं आहे. 

अहवालात पाय-या विस्तारण्याची शिफारसही करण्यात आली आहे. अतिरिक्त पाय-या असल्या पाहिजे असं अहवालात नमूद आहे. याशिवाय अधिका-यांनी तात्काळ संपर्क करण्यासाठी मोबाइल व्यतिरिक्त पर्याय वापरला पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे स्थानक आणि सुरक्षा कर्मचा-यांना वायरलेस हॅण्डसेट दिले पाहिजे अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. 

एलफिन्स्टन- परेल पुलावर 29 ऑगस्ट रोजी सकाळी नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला

Web Title: Elphinstone stampede - clean chit due to torrential rains, railway officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.