‘दर्शनी गॅलरी’ची पर्यटकांना भुरळ

By admin | Published: April 17, 2017 04:06 AM2017-04-17T04:06:59+5:302017-04-17T04:06:59+5:30

जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना/ छायाचित्रकारांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच महानगरपालिका मुख्यालय व इतर पुरातन वास्तुंचे

Embark on tourists' sightseeing gallery | ‘दर्शनी गॅलरी’ची पर्यटकांना भुरळ

‘दर्शनी गॅलरी’ची पर्यटकांना भुरळ

Next

मुंबई : जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना/ छायाचित्रकारांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच महानगरपालिका मुख्यालय व इतर पुरातन वास्तुंचे छायाचित्र काढण्यासाठी महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘दर्शनी गॅलरी’ची मुंबईकरांसह पर्यटकांना भुरळ पडली आहे. नुकतेच भारतीय तटरक्षक दलाच्या पवई शाळेतील मुलांनीही ‘दर्शनी गॅलरी’चे दर्शन घेतले असून, यात दिवसेंदिवस भरच पडणार आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत ‘दर्शनी गॅलरी’चे महानगरपालिका मुख्यालय, फिरोजशहा मेहता पुतळ्याजवळ, महापालिका मार्ग, फोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या पर्यटकांना फोर्ट परिसरातील अनेक वास्तुंची भुरळ पडते. विशेषत: महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वास्तू यात अधिक भर घालते.
रात्रीच्या वेळी येथे करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईमुळे पर्यटक याकडे आणखी आकर्षित होतात आणि येथील परिसर दिवसाएवढाच झगमगून जातो. यावर लक्ष केंद्रित करत पर्यटकांसह मुंबईकरांना ‘दर्शनी गॅलरी’तून येथील सौंदर्य टिपता यावे, म्हणून ही गॅलरी उभारण्यात आली आहे.
दरम्यान, नुकतेच लोकार्पण करण्यात आलेली ‘दर्शनी गॅलरी’ मुंबईकरांचा चर्चेचा विषय असून, याद्वारे येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील परिसरासोबत ‘सेल्फी’ ही काढता येणार असून, ‘दर्शनी गॅलरी’ची
क्रेझ अधिकाधिक वाढेल, असा आशावाद महापालिकेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)


भारतीय तटरक्षक दल शाळा :
शैक्षणिक अभ्यासासाठी भेटीचे आयोजन
शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पवई येथील भारतीय तटरक्षक दल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी नव्याने सुरू झालेल्या ‘दर्शनी गॅलरी’तून फोटो काढले. त्यामुळे ही भेट अधिकच संस्मरणीय झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.पवई येथे भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्रामुख्याने ही शाळा चालवली जाते. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मुख्यालयाच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना मुंबईविषयी आणि प्रामुख्याने महापालिकेच्या ऐतिहासिक इमारतीविषयी माहिती देण्यात आली.महापालिकेतर्फे नव्यानेच गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकाप्रमाणेच अनेक मुंबईकरांसह पर्यटकांना महापालिका मुख्यालयासमोर फोटो, सेल्फी काढायचे असतात, पण हा रस्ता रहदारीचा असल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळेच सुरू करण्यात आलेल्या गॅलरीत उभे राहून विद्यार्थ्यांनी या इमारतीची माहिती घेतली. या इमारतीच्या वास्तुकलेविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना महापालिका मुख्यालयाचे हेरिटेज महत्त्व समजावून देण्यात आले.
गॅलरीनंतर विद्यार्थ्यांना महापालिका सभागृहाला भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी सभागृहातील अंतर्गत रचना, कलाकुसर, तसेच सभागृहाचे हेरिटेज महत्त्व महापालिकेतर्फे समजावून
सांगण्यात आले.

Web Title: Embark on tourists' sightseeing gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.