Join us

म्हाडा पुनर्विकास प्रकल्पांना आता तातडीने मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 5:35 AM

म्हाडाचे अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तत्काळ मार्गी लावण्यासाठी आता म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : म्हाडाचे अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तत्काळ मार्गी लावण्यासाठी आता म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवे प्रकल्प किंवा पुनर्विकास प्रकल्प मंजुरीसाठी रखडवणाऱ्या म्हाडातील कर्मचारी आणि अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.म्हाडाअंतर्गत येणाºया प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी सरकारने म्हाडाला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचे अधिकार दिलेले आहेत. मात्र, असे असूनहीम्हाडाचे काही अधिकारी आणि कर्मचारी विनाकारण प्रकल्प मंजुरीमध्ये किंवा इतर कामांच्या मंजुरीमध्ये विनाकारण अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारे परिपत्रक म्हैसकरांनी म्हाडामध्ये काढले आहे.यापूर्वीच म्हाडा उपाध्यक्षांनी प्रकल्पांना तातडीने मंजुरीमिळावी यासाठी तीन स्वतंत्र कक्षांची सुरुवात केली होती. मात्र,प्रकल्प मंजुरीसाठी येणाºया फायलींमध्ये विनाकारण काहीही शेरे मारून मंजुरीला विलंब लावण्याचे प्रकार म्हाडा अधिकाºयांमध्येसध्या वाढले आहेत. यावरचाप आणण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांनी कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.म्हैसकर यांनी पत्रकात, म्हाडा अधिकाºयांनी कोणतेही ठोसकारण नसताना वारंवारएखादी मंजुरीची फाइल विनाकारण रखडवल्यास आता गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.>फायलीवर ठेवणार ‘वॉच’केवळ मलिदा खाण्यासाठी म्हाडामध्ये हे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी म्हाडा उपाध्याक्षांपर्यंत आलेल्या आहेत. एखाद्या मंजुरीच्या फाइलमध्ये कनिष्ठ अधिकारी वाटेल ते बदल सुचवतो. आणि ज्येष्ठ अधिकारी यातील सुचवलेले बदल न वाचता सही करतो. हे प्रकार सर्रास म्हाडात घडत आहेत. मात्र, यामुळे म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास दिवसेंदिवस रखडतो आहे.एखादी फाइल सहा सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही कारणासाठी म्हाडातील एका कक्षातून दुसºया कक्षात विनाकारण फिरवली जाण्याचे प्रताप म्हैसकरांच्या कानावर आल्याने त्यांनी तातडीने हे आदेश जारी केले आहेत. मंजुरीच्या फायलींमध्ये स्वत: म्हाडा उपाध्यक्ष आता लक्ष घालणार असल्याने म्हाडा अधिकाºयांमध्ये सध्या पळापळ सुरू आहे. मात्र, कारवाईच्या धाकापोटी म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आता झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :म्हाडा