ठळक मुद्देसुदैवाने सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरुप आहेत.सायंकाळी 4 वाजून 42 मिनिटांनी विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. उड्डाणानंतर अवघ्या दहा मिनिटात या विमानाला मुंबई विमानतळावर इमर्जन्स लँडिंग करावे लागले.
मुंबई - मुंबईहून मस्कत जाणाऱ्या ओमान एअरच्या विमानातील इंजिनामध्ये बिघाड झाल्याने उड्डाणानंतर अवघ्या दहा मिनिटात या विमानाला मुंबई विमानतळावर इमर्जन्स लँडिंग करावे लागले. सायंकाळी 4 वाजून 42 मिनिटांनी विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. ओमान एअरच्या फ्लाईट क्रमांक 204 सोबत हा प्रकार घडला. चार वाजून 58 मिनिटांनी विमानाने मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या लँडिंग केले. या विमानात 206 प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरुप आहेत.